बिलासपूर : शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने कानन पेंदारी प्राणी उद्यानात पर्यटकांची गर्दी चांगलीच वाढली होती. अनेक वेळा गर्दीत असे अनेक खोडकर नागरिक असतात, ज्यांना प्राण्यांना इजा करायची असते. मात्र शनिवारी दुपारी असे काही घडले, ज्याने सुरक्षा रक्षक आणि पर्यटकांना धक्का बसला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने सुरक्षा कठड्यावरुन उडी मारून सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला.
कानन पेंदारी प्राणीसंग्रहालयात गोंधळ : तरुणाने उडी मारताच पर्यटकांनी आरडाओरडा सुरू केल्याने लोकांमध्ये भिती पसरली. आणि सर्व नागरिक वाचवा वाचवा असे ओरडत होते. लोकांचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक तेथे आला, त्याने पिंजऱ्याच्या आत पाहिले तर, सिंहाच्या मागे एक तरुण उभा होता आणि तो हळू हळू सिंहाकडे जात होता. त्यानंतरच घाईघाईत कर्मचाऱ्यांनी याबाबत व्यवस्थापन व अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. एक महिला कर्मचारी सिंहाच्या अंधाऱ्या खोलीजवळ पोहोचली आणि तिच्या समजुतीमुळे तरुणाचा जीव वाचू शकला.
अशाप्रकारे वाचला तरुणाचा जीव : सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाने उडी मारल्याची माहिती मिळताच महिला उपवन रेंजर सुखबाई कंवर, व्यवस्थापन अधिकारी व प्राणिसंग्रहालयाच्या रक्षकासह सिंहाच्या पिंजऱ्यात पोहोचले. महिला डेप्युटी रेंजरच्या समजुतीमुळे तरुणाचे प्राण वाचले. महिला डेप्युटी रेंजरने अंधाऱ्या खोलीच्या बाजूने सिंहाला आवाज दिला आणि सिंह थेट अंधाऱ्या खोलीच्या आत गेला. त्यानंतर अंधाऱ्या खोलीचे गेट बंद झाल्याने तरुणाचा जीव वाचू शकला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा त्या तरुणाने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली, तेव्हा सिंह त्या वेळी विरुद्ध दिशेने पाहत होता आणि त्यामुळेच सिंहाने त्या तरुणावर हल्ला केला नाही.
तरुण मानसिक रुग्ण : सिंहाला अंधार असलेल्या खोलीत बंद केल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी तरुणाला बाहेर काढले. तरुणाकडून माहिती घेतली असता, तो कुंतल भीमटे हा मगरपारा आंबेडकर नगर येथील रहिवासी असल्याचे समजले. कुंतल भीमटे याला पाहून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसून आले. कानन पेंदारीच्या अधिकाऱ्यांना त्याने भेटीसाठी आलो असल्याचे सांगितले. याप्रकरणाची माहिती नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी तात्काळ कानन पेंदारी गाठून तरुणाची मानसिक स्थिती बऱ्याच दिवसांपासून ठीक नसल्याचे सांगितले. त्याला घरात कोंडून ठेवले आहे, मात्र तो केव्हा आणि कसा बाहेर आला हे त्यांना कळू शकले नाही, असे मत नातेवाईकांनी मांडले. त्यानंतर कायदेशीर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला दंड ठोठावून सोडून दिले.
हेही वाचा : Youths Burning Case: युवकांना बोलेरोत जिवंत जाळल्याचे प्रकरण.. राजस्थान पोलिसांकडून हरियाणात सहा जणांना अटक