महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण बचावला - कर्नाटकच्या नरसीपुरा तालुक्यात

कर्नाटकच्या नरसीपुरा तालुक्यात एक तरुण बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. (Young man escaped from leopard attack). तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामस्थांनी याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. (leopard attack in Mysore).

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 19, 2022, 10:36 PM IST

म्हैसूर : नरसीपुरा तालुक्यातील नुग्गल्लीकोप्पलू गावात बिबट्याच्या हल्ल्यातून एक तरुण बचावला. (Young man escaped from leopard attack). सतीश (३३) असे बिबट्यापासून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश उसाच्या शेतात पाणी घालण्यासाठी गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी सतीशने मोबाईलच्या सहाय्याने बिबट्यावर प्रतिहल्ला केला. नंतर तो तेथून गावाकडे पळाला. (leopard attack in Mysore).

बिबट्याच्या दहशतीत वाढ : सतीशची प्रकृती सध्या चिंतेची आहे. गंभीर जखमी झालेल्या सतीशला मंड्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी समजताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नरसीपुरा तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामस्थांनी याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details