महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Young Man Arrested : कारवर फटाके फोडणाऱ्या तरुणाला अटक - Driving Car with Bursting Firecrackers

उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील एका तरुणाला पोलिसांनी मुख्य रस्त्यावर फटाके फोडून गाडी चालवल्याबद्दल अटक केली. ( Driving Car with Bursting Firecrackers )

Young Man Arrested
फटाके फोडून गाडी चालवल्याबद्दल अटक

By

Published : Oct 29, 2022, 6:59 PM IST

कर्नाटक :उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील एका तरुणाला पोलिसांनी मुख्य रस्त्यावर फटाके फोडून गाडी चालवल्याबद्दल अटक केली.विशाल कोहली असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी विशालने त्याच्या कारवर फटाके फोडले होते आणि हॉस्पिटल, कॉलेज आणि पेट्रोल पंप असलेल्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने गाडी चालवत होता. विशालचा गजबजलेल्या रस्त्यावर मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आणि व्हिडिओ व्हायरल झाला. ( Driving Car with Bursting Firecrackers )

कारवर फटाके फोडणे पडले महागात; तरुणाला केले अटक

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत विशालविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली. शुक्रवारी पोलिसांनी विशालचा पत्ता काढला आणि त्याला अटक केली आणि कार जप्त केली. याप्रकरणी मणिपाल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details