मुंबई - वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात शनिवारी (२९ जानेवारी) भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. (U19 WC 2022 India U19 vs Bangladesh) यामध्ये गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात ५ गडी राखून विजय संपादन केला. भारतीय संघाने मागील विश्वचषकातील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. (India U19 vs Bangladesh U19 Super League Quarter Final) हा उपांत्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाची शानदार गोलंदाजी
या सामन्यात साखळी फेरीला मुकलेल्या नियमित कर्णधार यश धूल व उपकर्णधार शेख राशीद यांनी पुनरागमन केले. (India vs Bangladesh Highlights) यशने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय वेगवान गोलंदाज रवी कुमारने सार्थ ठरवला. त्याने केवळ १४ धावांवर बांगलादेशाचे तीन फलंदाजांना माघारी पाठवले. (India Beat Bangladesh By 5 Wickets) त्यानंतर विकी ओस्तवालने दोन गडी बाद करत बांगलादेशाला आणखी संकटात टाकले. कौशल तांबे, राजवर्धन हंगारगेकर व अंगक्रिश रघुवंशी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत बांगलादेशचा डाव ३७.१ षटकात १११ धावांवर संपवला. बांगलादेशसाठी आठव्या क्रमांकावरील फलंदाज मेहरोबने सर्वाधिक ३० धावा काढल्या आहेत.
अंगक्रिश रघुवंशी व शेख राशीद यांनी ७० धावांची शानदार भागीदारी