रांची (झारखंड) -आज (सोमवारी)योगिनी एकादशी आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या योगिनी एकादशीचे अनेक महत्त्व आहेत. यामुळे या एकादशीला खूप विशेष मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि संपूर्ण वर्षात 24 एकादशी येतात. मात्र, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात, असे रांची येथील ज्योतिषाचार्य स्वामी दिव्यानंद महाराज यांनी सांगितले.
रांची येथील ज्योतिषाचार्य स्वामी दिव्यानंद महाराज याबाबत सांगताना या मंत्राचा करावा जप -
असे मानले जाते, योगिनी एकादशीसाठी भाविक 'ॐ नमो: भगवते वासुदेवाए' या मंत्राचा जप करू शकतात. यामुळे भगवान विष्णु और लक्ष्मी प्रसन्न होऊन भाविकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. स्वामी दिव्यानंद यांनी सांगितले की, धूप, दीप, अगरबत्ती, प्रसाद यांना ब्रह्म मुहूर्तमध्ये मनापासून भगवान विष्णूला अर्पण केले तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
योगिनी एकादशी मागची कथा -
स्वामी दिव्यानंद महाराज यांनी सांगितले की, या एकादशीचे एक महत्त्व आहे. या एकादशीबाबत असे सांगितले जाते की, स्वर्गातील मानसरोवरात राजा कुबेर यांनी आपल्या हेम नावाच्या माळ्याला फूल आणायला पाठवले होते. मात्र, हेम माळीने आपली बायको विशालाक्षी सोबत गप्पा गोष्टी करण्यात अनेक तास घालवले. यामुळे कुबेर यांनी पुजेसाठी फूल मिळायला उशीर झाला. यामुळे त्यांना पूजा करायला उशीर झाला. यानंतर, हेम आपल्या बायकोपासून कायमस्वरुपती दूर होऊन जाईल, असा रागात कुबेर यांनी हेम माळी याला शाप दिला. यानंतर हेम माळी स्वर्गलोकमधील मानसरोवर सोडून पृथ्वीवर आला. येथे आल्यावर त्याला कुष्ठरोगाने ग्रासले. यानंतर ऋषि मार्कंडेय यांनी पृथ्वीवर येऊन हेम माळी याला योगिनी एकादशीचे व्रत करायले सांगितले. योगिनी एकादशीच्या व्रतामुळे हेम माळी शापमुक्त झाला. यानंतर तो पुन्हा आपली बायको विशालाक्षीजवळ स्वर्गलोकात जाऊ शकला.
स्वामी दिव्यानंद यांनी सांगितले की, योगिनी एकादशीच्या उपवासामुळे सर्व पाप नष्ट होऊन जातात. हिंदु धर्माशी संबंधित लोकांनी योगिनी एकादशीचे व्रत अवश्य केले पाहिजे, यामुळे भगवान विष्णु आणि लक्ष्मी यांचा आशिर्वाद प्राप्त होतो.