लखनऊ ( उत्तरप्रदेश ) : उत्तर प्रदेश सरकारने धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याचे आदेश दिले ( illegal loudspeakers removed in up ) आहेत. या संदर्भात सूचना जारी करताना अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी, पोलिस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकार्यांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल ३० एप्रिलपर्यंत सरकारला सादर करावा लागणार असून, मुदतीत अहवाल सादर न केल्यास कारवाई केली जाणार ( yogi government action against illegal loudspeakers ) आहे.
लाऊडस्पीकर काढताना सर्व धर्मगुरूंशी संवाद आणि समन्वयाच्या आधारे बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्यात यावेत, असे निर्देश गृह अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिले ( yogi government action against illegal loudspeakers ) आहेत. यासह जे लाउडस्पीकर वैध आहेत त्यांचा आवाज विहित मानकानुसार निश्चित केला पाहिजे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे पालन करण्यात आले आहे. परंतु असे अनेक जिल्हे आहेत जिथे आवाजाच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
अप्पर मुख्य सचिव गृह म्हणाले की, अशा धार्मिक स्थळांची यादी पोलीस स्टेशन स्तरावर तयार करावी. ज्याठिकाणी दिलेले नियम आणि आदेश पाळले जात नाहीत, त्याचा जिल्हास्तरावर साप्ताहिक आढावा घ्यावा. पहिला अहवाल त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांच्या विभागीय आयुक्तांना आणि त्यांच्या आयुक्तालय क्षेत्रातील पोलिस आयुक्तांना ३० एप्रिलपर्यंत उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.