महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Yogi Adityanath Oath : योगी आदित्यनाथ यांच्यासह 52 मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा यादी - योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदाची शपथ

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. त्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली ( Yogi Adityanath Oath ) आहे. त्यांच्यासमवेत अन्य 52 आमदारांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

Yogi Adityanath Oath
Yogi Adityanath Oath

By

Published : Mar 25, 2022, 7:22 PM IST

लखनौ -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ( Yogi Adityanath Oath ) आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात योगी 2.0 सरकारला सुरुवात झाली आहे. या शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री आणि भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री सामिल झाले होते.

सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळात पहिल्या टर्ममधील काही चेहरे कायम ठेवण्यात आले आहे. तर, काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या केशवप्रसाद मौर्य यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदी संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

कॅबिनेटमंत्री -सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता नंदी, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशीष पटेल, संजय निषाद

राज्य मंत्री - नितिन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रवीन्द्र जायसवाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापति, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालुस, मयंकेश्वर सिंह, दिनेश खटिक, संजीव गौड़, बलदेव सिंह ओलख, अजीत पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौर, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आजाद अंसारी, विजय लक्ष्मी गौतम

हेही वाचा -Harish Rao : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगाणात शेती खरेदी; तेलंगाणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा, वीजपुरवठा मुद्दा पेटला

ABOUT THE AUTHOR

...view details