रामदेव बाबाचे दहशतवादी कनेक्शन, तर बागेश्वर धाम बहुरूपी; जेडीयू नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य नवादा (बिहार) :योगगुरू रामदेव बाबा आणि बागेश्वर धाम बाबा धिरेंद्र शास्त्री यांच्यावर बिहारचे जेडीयू नेते गुलाम रसूल बलियावी यांनी चांगलीच टीका केली आहे. रामदेव महाराज हे विदेशी वंशाचे असून त्यांचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचे वक्तव्य त्यांनी नवादा येथे केले. यावेळी त्यांनी बागेश्वर धाम बाबा धिरेंद्र शास्त्री हे देखील बहुरुपी असल्याचे सांगितले. जनता दलाचे नेते गुलाम रसूल बलियावी यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
रामदेव बाबाचे लष्कर ए तोयबाशी संबंध :नितीश कुमार यांच्या पक्षाचे नेते असलेल्या गुलाम रसूल बलियावी यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर जोरदार टीका केली. रामदेव बाबा यांचे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. रामदेव बाबा हे अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयए या संघटनेचे एजंट असल्याचा दावाही गुलाम रसुल यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. रसुल यांनी रामदेव बाबा हे भारतात कधी आणि कसे आले याबाबत सवाल उपस्थित केला. त्यांना इतके लोन कसे मिळाले याची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
बागेश्वर धाम बाबा बहुरुपी :गुलाम रसुल बलियावी यांनी रामदेव बाबा यांचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचा दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. दुसरीकडे गुलाम रसुल यांनी बागेश्वर धाम बाबावरही हल्लाबोल केला. बागेश्वर धाम बाबा बहुरुपी असल्याची टीका गुलाम रसुल यांनी यावेळी केली. बागेश्वर धाम बहुरुपी असून बहुरुप्यांना आपल्या देशात कोणतीच जागा नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कपडे आणि मेकअप करुन कोणी देशाला भरकटवण्याचा प्रयत्न करु शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सैनिक भरतीत मुस्लिमांना मिळावे 30 टक्के आरक्षण :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकीस्तानची भीती वाटत असल्याची मुक्ताफळेही गुलाम रसुल यांनी उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर पाकीस्तानशी युद्ध करण्यास भीती वाटत असेल तर त्यांनी मुस्लिमांना सैन्यात 30 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणीही गुलाम रसुल यांनी केली. भारतीय सैन्यात जर 30 टक्के मुस्लीम युवकांना संधी दिली तर पाकीस्तान डोळे वर करुन भारताकडे पाहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाकीस्तान जेव्हा मिसाईल बनवून भारताला घाबरवत होता, तेव्हा एपीजे अब्दुल कलाम या मुस्लीम तरुणानेच उत्तर दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मुस्लीम सेफ्टी कायदा बनवण्याची मागणीही केली.
हेही वाचा - Firing In Sitamarhi SSB Camp : आपसातील वादातून जवानावर सहकाऱ्याचा गोळीबार, भारत नेपाळ सीमेवर होते तैनात