नवी दिल्ली :एका अंदाजानुसार, भारतात दरवर्षी कर्करोगाचे सुमारे दहा लाख नवीन रुग्ण आढळतात. एकूणच, भारतात कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे अर्धा दशलक्ष लोकांचे मृत्यू होतात. कर्करोग नियंत्रणात आणण्यासाठी रेडिएशन, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया यासारख्या वारंवार उपचारांचा वापर केला जातो, या उपचारांमुळे रुग्ण थकतात आणि त्यांचे जीवनमान कमी होते. येथेच कर्करोगाच्या रुग्णांसाठी निसर्गोपचार आणि योगाचा उपयोग होतो. हे उपचार रुग्णांच्या शरीराला आराम मिळवून देण्यास प्रभावी सिद्ध होऊ शकते. तसेच त्याचे दुष्परिणाम होत नसल्याने, रुग्णाचे सामान्य आरोग्य पुन्हा मिळण्यास मदत होते.
निसर्गोपचार पद्धचे उपाय : निसर्गोपचार ही औषधाची एक पूरक शाखा आहे, जी सुरक्षित आणि नैसर्गिक उपचारांचा वापर करते. तसेच कर्करोगातून बरे होण्यासाठी एक महत्त्वाची पायरी म्हणून डिटॉक्सिफिकेशनला उपयुक्त ठरते. रुग्णांना आरामदायी ठेवणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. निसर्गोपचार उपचारांना कर्करोगाच्या उपचारांशी जोडले जाऊ शकते.
कर्करोगाच्या रुग्णांना रेडिएशन किंवा केमोथेरपी उपचारांची आवश्यकता असते. मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, जसे की...
- अतिसार किंवा तोंडाला फोडे येणे : Diarrhoea or mouth sores.
- सांधे दुखी. Joint pain.
- थकान. Fatigue.
- रेडिएशन-प्रेरित त्वचारोग. Radiation-induced dermatitis.
- हात किंवा पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे. Numbness and tingling in the hands or feet.
- निद्रानाश. Insomnia
- मळमळ आणि उलटी. Nausea and vomiting.
- अंग गरम जाणवणे. Hot flashes.
- रोगप्रतिकारक प्रणालीचे नियमन. Immune system modulation