महाराष्ट्र

maharashtra

येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात अमेरिकेच्या जहाजावर डागले क्षेपणास्त्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 1:28 PM IST

येमेनच्या हुथी बंडखोरांनी रविवारी लाल समुद्रात अमेरिकेच्या जहाज युद्धनौकेवर हल्ला केला. अमेरिकन सैन्याने दावा केला आहे की, त्यांची युद्धनौका यूएसएस मेसनवर रविवारी रात्री हौथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या येमेनच्या भागातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला.

yemens houthi rebels
yemens houthi rebels

दुबई /येमेन : लाल समुद्रातील जहाजावरील हल्ल्यानंतर शुक्रवारी यूएस आणि मित्र राष्ट्रांनी बंडखोरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हुथींनी अमेरिकेच्या जहाजांना पहिल्यांदा लक्ष्य केलं आहे. या युद्धनौकेवर दोनदा क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही. दोन्ही क्षेपणास्त्रे एडनच्या आखातातील जहाजापासून 11 मैल अंतरावर पडल्याचे अमेरिकन लष्कराने सांगितले. यूएसएस मेसन आयझेनहॉवर कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा एक भाग आहे. सेंट्रल पार्क नावाच्या व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत माहिती मिळताच जहाजाच्या सुरक्षेसाठी (USS) मेसन सेंट्रल पार्क येथे पोहोचले. यूएसएस मेसनला पाहताच व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे पळू लागले. पण यूएसएस मेसनने त्यांना पकडले. यानंतर यूएसएस मेसन ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना एडनच्या आखातात मिसाइलने हल्ला करण्यात आला.

कोणतीही दुखापत नाही : लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागात कार्यरत असलेल्या युएसएस लॅबून या अर्लेह बर्क-क्लास डिस्ट्रॉयरला हुथींनी लक्ष्य केले, असे अमेरिकन लष्करी सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेने म्हटले आहे, की हे क्षेपणास्त्र लाल समुद्रातील बंदर शहर होडेदा जवळून आले आहे, जो हुथीच्या ताब्यात आहे. येमेनमधील इराण-समर्थित हुथी अतिरेकी भागातून यूएसएस लॅबूनवर जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यात कोणतीही दुखापत किंवा नुकसान झालं नाही.

समुद्राच्या दक्षिणेकडील भागात कार्यरत : युद्धनौका आणि पाणबुडीने सुरू केलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॉंम्बसह 28 ठिकाणी आणि 60 हून अधिक ठिकाणांवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हल्ल्याचा शुक्रवारी पहिला दिवस होता. शनिवारी अमेरिकन सैन्याने हुथी रडार साइटवर हल्ला केला. यूएस आर्मीच्या सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे की, लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागात कार्यरत असलेल्या अर्लेघ बर्क-क्लास डिस्ट्रॉयर यूएसएस लॅबूनला हुथी गोळीबारानं लक्ष्य केलं होते. शुक्रवारी, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हल्ल्यांच्या पहिल्या दिवशी, 28 ठिकाणी हल्ले झाले. 60 हून अधिक लक्ष्यांवर लढाऊ विमाने, युद्धनौका आणि पाणबुडीने सोडलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॉम्बने मारले गेले. त्यानंतर शनिवारी अमेरिकन सैन्याने हुथी रडार साइटवर हल्ला केला.

ABOUT THE AUTHOR

...view details