हैदराबाद -कर्नाटकच्या राजकारणात 28 वर्ष जुनी घटना पुन्हा घडली आहे. 1983 मध्ये जनता पार्टीचे सरकार होते. रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री बनले व त्यांच्या कॅबिनेटमध्ये एस. आर बोम्मई (S.R. Bommai) उद्योगमंत्री होते. अचानक हेगडे यांच्यावर राजकीय नेते व उद्योगपतींचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला. सुब्रमण्यम स्वामी यांनी रामकृष्ण हेगडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटकच्या सत्तेत खांदेपालट झाली व एस. आर. बोम्मई कर्नाटकचे 11वे मुख्यमंत्री ( 1988-89) बनले.
25 वर्षानंतर काळ पुढ सरकला व तीच घटना पुन्हा घडली. भारतीय जनता पार्टीने 2019 मध्ये बी. एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. कोरोना काळात दोन वर्ष सरकार शांततेत चालले. त्यानंतर अचानक बीजेपी हाईकमांडने राज्यात नेतृत्व परिवर्तन केले अन् बसवराज बोम्मई यांच्याकडे राज्याची सुत्रे सोपवली. ते कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री बनले. 28 जुलै राजी बसवराज यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन्ही घटनेत साम्य असे आहे, की एक म्हणजे दोन्ही सरकारे गैरकाँग्रेसी होती. दुसरे म्हणजे वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर 25 वर्षांनी मुलगा मुख्यमंत्री बनला. बसवराज बोम्मई कर्नाटकटचे दिग्गज नेते रहे एस.आर. बोम्मई यांचे पूत्र आहेत. राज्याच्या इतिहासात एच.डी.कुमारस्वामी नंतर बसवराज दूसरे नेते आहेत, ज्यांच्या वडिलांनीही मुख्यमंत्रीपद उपभोगले आहे. एच. डी. कुमारस्वामी यांचे वडील एच. डी देवगौडाही कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
पक्षश्रेष्टींकडून मुख्यमंत्रीपदाची माळ बसवराज यांच्या गळ्यात का ?
१) बसवराज बोम्मई यांची प्रतिमा स्वच्छ आहे. आतापर्यंत त्यांच्यावर भष्टाचाराचा एकही आरोप लागला नाही.
२) बसवराज बोम्मई वीराशैव-लिंगायत समुदायातील आहेत. बी. एस. येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर लिंगायत समुदायाच्या मठाधीशांमध्ये नाराजी होती. लिंगेश्वर मंदिराचे मठाधीश शरन बसवलिंग यांनी इशारा दिला होता, की येदियुरप्पा यांना हटवल्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल.
३) राज्यात सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे जवळपास 17 ट्क्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे. त्यामुळे आतापर्यंत कर्नाटकचे 8 मुख्यमंत्री याच समाजातील बनले आहेत. राज्यात जवळपास 120 विधानसभा मतदारसंघात या जातीचा प्रभाव आहे. त्यामुळे बीजेपीने लिंगायत नेत्याला सीएम पद देऊन त्यांना नाराज केले नाही.
४) येदियुरप्पा यांनी 31 जुलै 2011 रोजी भाजपचा राजीनामा दिला होता व 30 नोव्हेंबर 2012 ला कर्नाटक जनता पक्षाच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यावळे भाजपचे अनेक दिग्गज नेते येदियुरप्पा यांच्याबरोबर पक्षसोडून गेले होते. मात्र बसवराज भाजपात राहिले होते. 2008 मध्ये येदियुरप्पा यांनीच त्यांनी भाजपमध्ये आणले होते.
५) येदियुरप्पा यांनीच बसवराज बोम्मई यांचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचवले होते. येदिंनी लिंगायत मठाचीही बसवराज यांच्यासाठी पसंती मिळवली आहे. त्याचबरोबर बसवराज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते लोकप्रिय आहे. त्यामुळे बोम्मई केंद्र आणि राज्याच्या समीकरणात फिट बसले.
६) 61 वर्षीय बोम्मई सीएम बनण्यापूर्वी येदियुरप्पा सरकारमध्ये गृह, कानून, संसदीय कामकाज मंत्री यादि विभाग सांभाळत होते. आपल्या मंत्रालयात त्यांनी केंद्राची धोरणे लागू केली व स्वत:ला समाजवादी नेत्यांच्या प्रतिमेतून वेगले केले.
७) बसवराज यांनी विधानसभेत पक्षाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. सर्व पक्षात त्यांचे मित्र आहेत. अनेक वेळा त्यांनी विरोधकांना शांत केले आहे.