नवी दिल्ली -टेरर फंडिंग प्रकरणात ( Yasin Malik Accused In Terror Funding Case ) दोषी ठरलेल्या यासिन मलिकला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर ( Yasin Malik Present In Patiala House Court ) करण्यात होते. त्यानंतर आता न्यायालयाने यासिन मलिकला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले -19 मे रोजी न्यायालयाने यासीन मलिकला दोषी ठरवले होते. यासिन मलिकने १० मे रोजी गुन्ह्याची कबुली दिली होती. 16 मार्च रोजी न्यायालयाने हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन, यासीन मलिक, शब्बीर शाह आणि मसरत आलम, रशीद इंजिनियर, जहूर अहमद वताली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहम शाह, नईम खान, बशीर अहमद बट उर्फ पीर सैफुल्ला आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. एनआयएच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि हिंसाचार घडवून आणला. 1993 मध्ये फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, हाफिद सईदने हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी संगनमत करून दहशतवादी कारवाया करण्यासाठी हवाला आणि इतर माध्यमांद्वारे पैशांचा व्यवहार केला. त्यांनी हा पैसा खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी, सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी, शाळा जाळण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी वापरला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनआयएने भारतीय दंड संहितेच्या कलम १२०बी, १२१, १२१ए आणि यूएपीएच्या कलम १३, १६, १७, १८, २०, ३८, ३९ आणि ४० अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
यासिन मलिकच्या सर्मथकांकडून दगडफेक
यासिनच्या समर्थकांकडून दगडफेक -यासिन मलिकला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यातच आता जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण तयार झाले आहे. यासिनच्या समर्थकांकडून पुन्हा जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. तसेच, यासिन मलिकच्या श्रीनगरमधील घराबाहेर काही तरुण जमले असून, समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. तर, पोलिसांनी तरुणांवर अश्रूधुरांचा मारा केला आहे. त्यामुळे श्रीनगरमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा -Kapil Sibal Resigns : कपिल सिब्बल यांचा काँग्रेसचा राजीनामा, सपाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल