महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Wrestlers in FIR : ब्रिजभूषणच्या कारनाम्याची लक्तरे वेशीवर, चुकीच्या पद्धतीने स्पर्ष, लैंगिक सुखाची मागणी, एफआयआरमध्ये माहिती - कुस्तीपटूंचा विनयभंग

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.

ब्रिजभूषण
ब्रिजभूषण

By

Published : Jun 2, 2023, 2:56 PM IST

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या दोन एफआयआरमध्ये गंभीर आरोप केले आहेत. यापैकी एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. पहिली एफआयआर अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांवर आधारित आहे.

कुस्तीपटूंचा विनयभंग -दुसरी एफआयआर इतर सहा कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर आधारित आहे. एफआयआरमध्ये पीडित महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यामुळे त्यांचे करिअर धोक्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांना नीट सरावही करता येत नव्हता आणि खेळताही येत नव्हते. कुस्तीपटूंचा विनयभंग करण्यासाठी ब्रिजभूषण शरण सिंह ज्या हॉटेलवर खेळाडू राहत असत त्याच मजल्यावरची खोली जाणूनबुजून बुक करत असल्याचा आरोप एका कुस्तीपटूने केला आहे.

रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न -कुस्तीपटूंनी सांगितले की 2021 मध्ये ते बल्गेरियात खेळायला गेले होते. ब्रिजभूषण यांनी हॉटेलमध्ये स्वतःच्या मजल्यावरची खोलीही बुक केली होती. ते लुंगी घालून हॉटेलमध्ये फिरत असत आणि खेळाडूंशी जबरदस्तीने बोलत असत. ते महिला कुस्तीपटूंना अशा गोष्टी खायला द्यायचे, ज्या खेळाडूंना मिळत नाहीत. या बहाण्याने ते महिला कुस्तीपटूंशी बोलायचे आणि त्यांच्या रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचे.

चुकीच्या पद्धतीने स्पर्ष - अल्पवयीन कुस्तीपटू म्हणाली की, चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला गेला. पदक जिंकलेल्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने हा आरोप केला आहे. यानंतर ब्रिजभूषणने तिच्यासोबत फोटो काढण्याच्या बहाण्याने तिला घट्ट पकडून ठेवले. त्याच्याकडे ओढले, खांद्यावर जोरात दाबले आणि मग मुद्दाम हात खाली सरकवून तिच्या स्तनाला स्पर्श केला, असेही तिने म्हटले आहे. त्याच्या अशा कृत्यापूर्वीही पीडितेने स्पष्ट केले होते की त्याने तिच्या मागे जाऊ नये, तिला त्याच्याशी असे संबंध ठेवण्यात स्वारस्य नाही.

याप्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तिच्या वडिलांनी सांगितले की ब्रिजभूषणने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिला सांगितले की जर तिने त्याला पाठिंबा दिला तर तो कुस्तीमध्ये तिला पाठिंबा देत राहील. यावर पीडितेने सांगितले की, कठोर परिश्रम करून इथपर्यंत पोहोचले असून भविष्यात कठोर परिश्रम करूनच आपले करिअर घडवणार.

जेवताना कुस्तीपटूचा विनयभंग झाला, हॉटेलमध्ये जेवताना ब्रिजभूषणने तिला आपल्या टेबलावर बोलावून छातीपासून पोटापर्यंत स्पर्श केल्याचा आरोप एका महिला कुस्तीपटूने केला आहे. कुस्ती महासंघाच्या कार्यालयात त्यांचे गुडघे, खांदे, तळवे आणि पायाला स्पर्श करण्यात आला. श्वासोच्छवासाचा नमुना समजून घेण्याच्या बहाण्याने त्याने छातीवरून पोटापर्यंत हात फिरवला.

लैंगिक सुखाची मागणी -हॉटेलमध्ये मुक्कामाच्यावेळी ब्रिज भूषणने तिला आपल्या खोलीत बोलावल्याची तक्रार आणखी एका कुस्तीपटूने केली आहे. त्याने तिला बेडवर बोलावून जबरदस्तीने मिठी मारली. त्याने तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. सप्लिमेंट्स खरेदी करण्यासाठी पैसे द्यायचे आमिष दाखवल्याचेही तिने सांगितले. तर एक कुस्तीपटू मॅटवर पडली असता तिचा टीशर्ट ओढल्याचा आरोपही एका कुस्तीपटूने केला आहे.

टी-शर्टमध्ये हात घातला -आणखी एका प्रकरणात एका महिला कुस्तीपटूने आरोप केला की. श्वासोच्छवासाची चाचणी घेण्याच्या बहाण्याने ब्रिजभूषणणे तिच्या पोटावरुन नाभीपर्यंत चुकीच्या पद्धतीने हात फिरवला. एकदा तिला फेडरेशनच्या कार्यालयात बोलावण्यात आले. ती तिच्या भावासोबत गेली होती. त्यावेळी ब्रिजभूषण यांनी भावाला बाहेर थांबण्यास सांगून आपल्या खोलीत बोलावले. खोली बंद केल्यानंतर तिला ओढून जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. एका कुस्तीपटूने आरोप केला आहे की, ब्रिजभूषण सिंह यांनी एकटे पाहून तिच्या टी-शर्टमध्ये हात घातला. अन्य दोन कुस्तीपटूंनी आरोप केला आहे की, ब्रिजभूषण यांनी वेगवेगळ्या बहाण्याने त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केला आणि लैंगिक सुखाची मागणी केली.

हेही वाचा -

  1. Naresh Tikait Mahapanchayat : आधी ब्रिजभूषणला अटक करा, मग करारावर चर्चा - खाप पंचायतीत नरेश टिकैत यांची स्पष्टोक्ती
  2. Brij Bhushan Sharan Singh: गंगेत मेडल विसर्जित करून मला फाशी होणार नाही, ब्रिजभूषण सिंग यांची दर्पोक्ती
  3. Wrestler Protest : तर भारतीय कुस्ती परिषद निलंबित करू, कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीची जागतिक कुस्ती संघटनेकडून दखल

ABOUT THE AUTHOR

...view details