महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Wrestlers Protest: कुस्तीपट्टू नवीन संसदभवनासमोर करणार महिला पंचायतीचे आयोजन, समर्थकांना रोखले जात असल्याचा आरोप - Wrestlers Protest

महापंचायतीबाबत कुस्ती पट्टूंनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी विनेश फोगट म्हणाल्या की, जो कोणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे, त्यांना पोलीस अडवत आहेत. आमचे काय होईल माहीत नाही. संसद उद्घाटना दिवशीच महापंचायत होणार असल्याने सरकारची चांगलीच पंचायत होणार आहे.

Wrestlers Protes
Wrestlers Protes

By

Published : May 28, 2023, 7:20 AM IST

Updated : May 28, 2023, 9:43 AM IST

कुस्तीपट्टूंचे आंदोलन सुरुच

नवी दिल्ली : दिल्लीत नवीन संसदेचे उद्घाटन होत असताना जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. नवीन संसद भवनासमोर महिला महापंचायतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कुस्तीपट्टुंना सांगितले. मात्र, दिल्ली पोलिसांनी महापंचायतीला परवानगी दिलेली नाही. तरीही महापंचायतची आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्धार कुस्तीपुट्टुंनी व्यक्त केला आहे. महापंचायतीबाबत कुस्तीपट्टूंनी शनिवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

पत्रकार परिषदेदरम्यान कुस्तीपट्टू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक उपस्थित होते. यावेळी बोलताना विनेश फोगटच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, की हे सरकार ब्रिजभूषण शरण यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे, हेच कळत नाही. महापंचायतीसाठी आम्ही आवाहन केल्यानंतर काही महिला संघटनांनी सहभागी होण्याची तयारी दाखविली. या महिला संघटनांच्या घरांवर पोलिसांनी पहारा ठेवला आहे. पटियालामध्येही पोलिसांनी आमच्या समर्थकांना रोखले आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. ब्रिजभूषणला देवता का बनविले जाते, हे माहित नाही.

मारहाण केली तरी आम्ही हिंसाचार करणार नाही-कुस्तीपटू विनेश फोगट म्हणाल्या की, आत्तापर्यंत आमच्या लढाईत पाठिंबा देणाऱ्या सर्व देशवासीयांचे आम्ही आभारी आहोत. आपणही आता भीतीच्या छायेत आहोत. उद्या आमचे काय होईल माहीत नाही. आपण जगू की नाही, याची खात्री नाही. अनेक व्हिडिओ आमच्याकडे येत असल्याचे त्याने म्हटले आहे. आम्हाला समर्थन देण्यासाठी येणाऱ्या लोकांना रोखून पोलीस त्यांच्या गैरवर्तन करत आहेत. विनेश फोगट यांनी रडत रडत म्हटले आहे की, आम्ही खूप कठीण परिस्थितीत येथे आंदोलनाकरिता बसलो आहोत. आमची अवस्था फार वाईट आहे. आम्ही आता खूप घाबरलो आहोत.

पोलिसांनी संपूर्ण दिल्ली पूर्णपणे बंद केली आहे. पण काहीही झाले तरी आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत. आम्ही घाबरणार नाही आणि उद्या नक्कीच महापंचायत घेऊ. पोलिसांनी आम्हाला मारहाण केली तरी आम्ही हिंसाचार करणार नाही-कुस्तीपट्टू विनेश फोगट

हेही वाचा-

  1. Wrestlers Protest : शेतकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम, 11 मे पर्यंत न्याय मिळाला नाही तर..
  2. AAP Protest Against Brijbhushan Singh : ब्रिजभूषण यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे 'चप्पल मारो आंदोलन'
  3. Wrestlers Protest : खेळाडूंनी चौकशी पूर्ण होऊ द्यावी - केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर
Last Updated : May 28, 2023, 9:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details