गोल्डन गर्ल पीटी उषावर कुस्तीपटूंचा पलटवार नवी दिल्ली : कुस्तीपटू कुस्तीपटू गेल्या चार दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. या वादात आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष तथा भारताची गोल्डन गर्ल पीटी उषानेही उडी घेतली आहे. कुस्तीपटू भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे आले नाहीत. उलट त्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे हे खेळाच्या विकासासाठी चांगले नसल्याची प्रतिक्रिया देत पीटी उषा यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या या नाराजीला कुस्तीपटू विनेश फोगाटने जोरदार हल्लाबोल केला आहे.
मजबुरीमुळे बसलो आंदोलनाला रस्त्यावर :भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे नाराजी व्यक्त केल्याने कुस्तीपटू संतापले आहेत. विनेश फोगाटने पीटी उषा यांच्यावर पलटवार करत काही मजबुरीमुळे आंदोलनाला बसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. कुठेही येऊ जाऊ शकतो. मात्र आम्ही आमच्या मजबुरीमुळे रस्त्यावर बसलो आहोत. ऑलंपीक असोसिएशन, क्रीडा मंत्रालय आणि कुस्ती महासंघानेही आमचे ऐकले नसल्याने आम्हाला जंतरमंतरच्या रस्त्यावर बसावे लागल्याने विनेश फोगाटने स्पष्ट केले.
तीन महिन्यापासून मारल्या चकरा :विनेश फोगाटने पीटी उषावर हल्लाबोल करताना आम्ही देशासाठी इतकी पदके आणली मात्र आमची कोणी दखल घेतली नाही. पीटी उषा आणि मिल्खा सिंग यांना आम्ही आमचे आयकॉन मानतो. मात्र तरीही पीटी उषा यांनी असे विधान केले आहे, त्यांनी असे विधान करू नये. आम्ही पीटी उषा यांनाही फोन केला, पण त्यांनी आमच्या कॉलला उत्तर दिले नाही. 3 महिन्यापासून आम्ही चक्करा मारत आहोत. हे त्यांच्यासोबत घडले असते तर ते दडपण त्या सहन करू शकल्या नसत्या. त्यांच्यावर सध्या काय दडपण आहे, हे कळत नाही. शेवटी कोणाच्या भीतीने पीटी उषा असे वक्तव्य करत आहेत. त्यांचीही काही मजबुरी असू शकते, असेही विनेश फोगटने यावेळी सागंतिले.
तुमचा काळ आठवा : पीटी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष ( IOA ) आहेत. मात्र त्या स्वतः मीडियासमोर न्यायाची याचना करताना रडत होत्या. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही, मग आम्ही काय ? त्यांनी क्रीडा मंत्रालयाला का कळवले नाही ? मीडियासमोर रडताना दिसल्यावर त्या पंतप्रधानांना का भेटली नाही ? आम्हीही त्यांना प्रत्यक्ष फोन करून त्यांच्या समस्या विचारल्या होत्या, पण त्यांनी एकदाही विचार केला नाही. आज पैलवानांना आंदोलन करायला भाग पाडले जाते, त्यामुळे त्यांना बोलावून त्यांचे हित विचारले पाहिजे. हे देशाचे मोठे दुर्दैव आहे, आपले भविष्य अंधारात जात आहे. आमचे ऐकणारे कोणी नसल्याचेही विनेश फोगाटने यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Dantewada attack : दंतेवाडा हल्ल्याची जबाबदारी पीएलजीए या नक्षलवादी संघटनेने घेतली