हैदराबाद :दिवाळीच्या (Diwali) दिवशी देवी लक्ष्मी (Lakshmi) आणि गणपतीची (Ganesha) योग्य रीतिरिवाजानुसार पूजा केली जाते. 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. दिवाळी पूजेदरम्यान भगवान गणेश, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा (Lakshmipujan) केली जाते. असे मानले जाते की, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी लोकांच्या घरी येते. तुमच्या राशीनुसार (Zodiac Signs) देवी लक्ष्मीची उपासना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.
दिवाळी पाच दिवस साजरी केली जाते. शास्त्रानुसार, जर लोकांनी दिवाळीच्या दिवशी त्यांच्या राशीनुसार लक्ष्मीची पूजा केली तर त्यांच्या जीवनात समृद्धी येईल.
मेष:मंगळ हा मेष राशीचा अधिपती आहे. देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करणे, पूजेच्या वेळी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करणे, हनुमानाची पूजा करणे लाभदायक मानले जाते.
वृषभ: शुक्र या राशीचा अधिपती आहे. पूजेनंतर देवी महालक्ष्मीला लाल फुले अर्पण करणे आणि तिची प्रार्थना करणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
मिथुन: मिथुन राशीचा अधिपती बुध आहे. दिवाळी पूजेच्या वेळी देवी लक्ष्मी आणि गणपतीला भोग म्हणून 'मोदक' अर्पण करून समृद्धी प्राप्त करावी.
कर्क: कर्क राशीवर चंद्राचे राज्य आहे. दिवाळी पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला कमळाची फुले अर्पण केल्याने उपासकाच्या जीवनात यश मिळेल.
सिंह: सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे. सकाळी लवकर आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे लाभदायक ठरेल.