चेंगडू: श्रीजा अकुला ( Srija Akula ) आणि दिया चितळे ( Diya Chitale ) यांनी नेत्रदीपक विजय नोंदवले, परंतु स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राने तिचे दोन्ही सामने गमावले. बात्राच्या पराभवामुळे शनिवारी ITTF वर्ल्ड टीम चॅम्पियनशिपच्या ( ITTF World Team Championship ) पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला जर्मनीकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला.
भारतीय पुरुष संघाने मात्र चांगली कामगिरी करत गट 2 च्या सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत 44व्या स्थानी असलेल्या बात्राला जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या यिंग हानला पुढे टिकता आले नाही. जर्मन खेळाडूने भारतीय खेळाडूचा 3-0 (11-3 11-1 11-2) असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
जागतिक क्रमवारीत 77व्या क्रमांकावर असलेल्या श्रीजाने नंतर उच्च रँकिंग असलेल्या नीना मित्तलहमचा 3-0 (11-9, 12-10, 11-7) पराभव करून भारताला पुनरागमन करुन दिले. यानंतर जागतिक क्रमवारीत 122व्या क्रमांकावर असलेल्या दियाने सबाइन विंटर्सवर 3-1(11-9, 8-11, 11-6, 13-11) असा विजय नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली.