नवी दिल्ली -रेबीजआजाराचे दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठीच्या उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला ( World Rabies Day 2022 ) जातो. रेबीजची पहिली लस विकसित करणारे फ्रेंच जीवशास्त्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. रेबीज प्रतिबंधासाठी जनजागृकता करण्याचा हा एकमेव दिवस आहे. कुत्रा, वन्य प्राणी, वटवाघुळ, माकड यांसारख्या प्राण्यांमुळे रेबीजचे विषाणू सहज पसरू शकतात. यामुळेच हे प्राणी पाळणाऱ्यांना डॉक्टर नेहमी अधिक काळजी घेण्याचा सल्ला देतात.
जागतिक रेबीज दिवसाचा इतिहास -जागतिक रेबीज दिन पहिल्यांदा 28 सप्टेंबर 2007 रोजी साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या सहकार्याने रेबीज कंट्रोल आणि सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. जगात मोठ्या प्रमाणात लोकांना रेबीजचे दुष्परिणाम भोगावे लागल्यानंतर या संघटनांनी हा दिवस पाळण्यास सुरुवात ( Rabies Day History ) केली.
जागतिक रेबीज दिनाचे महत्त्व - रेबीजचा मानव आणि प्राणी यांच्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक रेबीज दिन साजरा केला ( Rabies Day Significance ) जातो. हा दिवस रेबीज नियंत्रित करण्याचे मार्ग शोधण्यावर भर देण्यासाठी, माहिती आणि सल्ला देण्यासाठी समर्पित आहे. रेबीजसारख्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्राण्यांची चांगली काळजी घेणे हा संदेश या दिवसातून दिला जातो.
रेबीज टाळण्यासाठी मार्ग