नवी दिल्ली : एकीकडे चीन विज्ञान, अर्थव्यवस्था आणि संरक्षण क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. तर, एकीकडे एका गोष्टीचा आकडा सातत्याने घटत आहे. याच कारणामुळे चीनी प्रशासन चिंतेत आहे. त्याच दरम्यान एका अहलावामुळे चीनचे टेन्शन अधिक वाढले आहे. संयुक्त राष्ट्राने ( United Nations ) अलीकडेच एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये २०२३ पर्यंत लोकसंख्येबाबत भारत चीनला मागे टाकणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी चीनमध्ये जन्मदर कमी होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. ( World Population To Hit 8 Billion People )
World Population : लोकसंख्येबाबत भारत चीनला मागे टाकणार; जगाची लोकसंख्या 8 अब्ज होईल - संयुक्त राष्ट्राचा अहवाल - २०२३ पर्यंत लोकसंख्येबाबत भारत चीनला मागे टाकणार
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राने ( United Nations ) केलेल्या दाव्यानुसार, १५ नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी जगभरातील लोकसंख्या ८ अब्ज हा आकडा पार ( World Population To Hit 8 Billion People ) करणार आहे. असा अंदाज व्यक्त केला आहे.
लोकसंख्या सुमारे 8.5 अब्ज : संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्जांवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अंदाजानुसार 2030 मध्ये जागतिक लोकसंख्या सुमारे 8.5 अब्ज, 2050 मध्ये 9.7 अब्ज आणि 2100 मध्ये 10.4 अब्ज पर्यंत वाढू शकते.
लोकसंख्येचा एकूण वाढीचा दर कमी :जागतिक लोकसंख्या दिनासंदर्भात सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्ट अहवालात असेही म्हटले आहे की जागतिक लोकसंख्या 1950 नंतर सर्वात कमी वेगाने वाढत आहे, 2020 मध्ये एक टक्क्यांहून कमी होत आहे. जागतिक लोकसंख्या 7 वरून 8 अब्जांपर्यंत वाढण्यास 12 वर्षे लागली, तर 9 अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 15 वर्षे (2037 पर्यंत) लागतील, हे एक संकेत आहे की जागतिक लोकसंख्येचा एकूण वाढीचा दर कमी होत आहे.