महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जबलपूरमध्ये आहे जगातील सर्वात महाग आंबा; तब्बल दोन लाख रुपये किंमत - जबलपुर में आम की पैदावार

'ताईऔ नो तमगौ' नावाचा हा आंबा जपानमध्ये आढळतो. यालाच 'एग ऑफ दि सन' असेही म्हणतात. जबलपूरमधील संकप्ल परिहार आणि रानी परिहार यांच्या बागेमध्ये इतर आंब्यांच्या झाडांसह या आंब्यांची झाडेही आहेत. गेल्या चार वर्षांपासून या 'ताईऔ नो तगमौ' झाडाला फळं येत आहेत.

world-most-expensive-japanese-mango-production-in-jabalpur
जबलपूरमध्ये आहे जगातील सर्वात महाग आंबा; तब्बल दोन लाख रुपये किंमत

By

Published : Jun 8, 2021, 5:32 PM IST

जबलपूर :आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. भारतातील हापूस आंबा तर जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, हापूस हा जगातील सर्वात महाग आंबा नाही. मुळात जगातील सर्वात महागडा आंबा हा भारतातलाही नाही. आम्ही ज्या आंब्याबद्दल सांगत आहोत, तो जपानमधील आंबा आहे. या आंब्याचे दर दोन लाख रुपये प्रति किलो आहेत. मात्र, या आंब्याची चव चाखण्यासाठी जपानलाच गेलं पाहिजे असंही नाही; भारतातच जबलपूरच्या एका बागेमध्ये तुम्हाला हा आंबा मिळून जाईल.

'ताईऔ नो तमगौ' नावाचा हा आंबा जपानमध्ये आढळतो. यालाच 'एग ऑफ दि सन' असेही म्हणतात. जबलपूरमधील संकप्ल परिहार आणि रानी परिहार यांच्या बागेमध्ये इतर आंब्यांच्या झाडांसह या आंब्यांची झाडेही आहेत. गेल्या चार वर्षांपासून या 'ताईऔ नो तगमौ' झाडाला फळं येत आहेत.

जबलपूरमध्ये आहे जगातील सर्वात महाग आंबा; तब्बल दोन लाख रुपये किंमत

हौस म्हणून लावले झाड..

जपानमधील या झाडाला अगदी कमी फळं येतात, ज्यांना भारतात चांगली किंमतही मिळत नाही. मात्र, तरीही परिहार यांनी केवळ हौस म्हणून ही झाडे लावली, आणि त्यांना यशही मिळालं. जपानमध्ये या झाडाला पॉलीहाऊसमध्ये वाढवतात. मात्र, भारतात हे मोकळ्या वातावरणातही येते.

इतरही विविध प्रकारचे आंबे..

परिहार यांच्या बागेमध्ये या जपानी आंब्याव्यतिरिक्त आणखीही विशेष झाडं आहेत. यामध्ये स्वर्ग बैंगनी आणि पिंक मॅंगोचाही समावेश आहे. तसेच, त्यांच्या बागेमध्ये टूकेजी नावाचाही एक आंबा आहे. नावाप्रमाणेच या एका आंब्याचे वजन सुमारे दोन किलो असते. विशेष म्हणजे, हे सर्व झाडे खुल्या वातावरणात मोठी होतात. यांची विशेष अशी काही देखभाल करावी लागत नाही.

चोरांपासून रक्षा करणे गरजेचे..

या आंब्यांच्या झाडांना वाढवणे जिकिरीचे काम नसले, तरी त्यांची रक्षा करणे मात्र अवघड काम होते. कित्येक चोर या महागड्या आंब्यांवर लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे २४ तास याठिकाणी लक्ष ठेवावे लागते, असे परिहार यांनी सांगितले.

त्यांच्या या बागेत हापूस, नूरजहां, मल्लिका आणि दशहरी आंबेही आहेत. या परिसरातील वातावरण हे आंब्यासाठी अगदीच पोषक आहे. मात्र, याबाबत सरकारने अद्याप लहान शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली नाही. तसेच, कित्येक शेतकऱ्यांना ते परवडतही नाही. सरकारने जनजागृती करण्यासोबतच शेतकऱ्यांना यासाठी काही मदत दिली, तर परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल; असे मत परिहार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :अबब ! एका नूरजहां आंब्याची किंमत 1000 रुपये; झाडावरून काढण्यापूर्वीच बुकींग

ABOUT THE AUTHOR

...view details