हैदराबाद :जागतिक दूध दिन 1 जून रोजी साजरा केला जातो. जागतिक दूध दिन हा दिवस साजरा करण्यासाठी 2001 साली सुरूवात करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने याची सुरुवात केली. आपल्या आहारात ते किती महत्त्वाचे आहे. हे समजावून सांगण्यासाठी आणि आहारात दुधाचा समावेश करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. गेल्या वर्षी जागतिक दूध दिनात ७२ देश सहभागी झाले होते. 1 जून रोजी जागतिक दूध दिवस आणि 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस भारतात साजरा केला जातो. कारण याच दिवशी 1921 साली भारतातील श्वेतक्रांतीचे जनक आणि दूध उत्पादनाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वर्गीस कुरियन यांचा जन्म झाला.
वर्गीस कुरियन कोण आहेत ?वर्गीस कुरियन यांना भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हटले जाते, त्यांना 'मिल्क मॅन' म्हणूनही स्मरले जाते. कारण त्यांच्या योगदानामुळे भारत आज दुध आयात करणारा देश बनून जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशांपैकी एक बनला आहे. कुरियन यांनी 1970 मध्ये श्वेतक्रांती सुरू केली, ज्याचा उद्देश भारतातील दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी होता. 1965 ते 1998 पर्यंत, डॉ. वर्गीस कुरियन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष होते आणि या काळात त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणजे आज भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन होत आहे.