महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Largest Rakhi : कधीकाळी दरोडेखोरांचा जिल्हा असलेल्या चंबळमध्ये जगातील सर्वात मोठी राखी, पहा व्हिडिओ - MAKING WORLD LARGEST RAKHI

(World largest Rakhi) (Guinness World Records) चंबळला दरोडेखोरांचा बालेकिल्ला म्हटलं जायचं, त्याच चंबळच्या भिंड जिल्ह्यानं आज जागतिक पटलावर आपलं नाव नोंदवलं आहे. भिंड जिल्हा जगातील सर्वात मोठ्या राखीसाठी ओळखला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र सणावर मेहगावच्या सामाजिक कार्यकर्ते अशोक भारद्वाज यांनी जगातील सर्वात मोठी राखी बनवली आहे. त्यामुळं त्यांनी आपलं तसंच जिल्ह्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलयं.

World Largest Rakhi
जगातील सर्वात मोठी राखी

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 8:59 PM IST

जगातील सर्वात मोठी राखी

भिंड : (World largest Rakhi) (Guinness World Records) समाजसेवक अशोक भारद्वाजसह त्यांच्या टीमनं 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 5 विश्वविक्रम केले आहेत. प्रत्यक्षात हा विक्रम जगातील सर्वात मोठ्या राखीसाठी नोंदवण्यात आला आहे. रक्षाबंधननिमित्तानं भिंडमध्ये केलेल्या या अनोख्या विश्वविक्रमासाठी अशोक भारद्वाज यांना प्रमाणपत्र देण्यात आलयं. या प्रसंगी ईटीव्ही भारतनं एशिया बुक रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

1150 फूट उंच राखीची नोंद :लंडनमधील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी ऋषी नाथन यांनी सांगितलं की, "जगातील सर्वात मोठी राखी बनवल्यामुळं मी येथे आलोय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये राखीची नोंद करण्यासाठी राखीची रचना, लांबी आदींची नोंद केली जाते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठी राखी ही 3.02 मीटर होती. मात्र, भिंडमध्ये एक अप्रतिम विक्रम पहायला मिळाला. येथं आम्ही 1 हजार 150 फूट उंच राखीचा नवा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलाय. त्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होतोय. भिंड जिल्ह्यातील मेहगाव येथील अशोक भारद्वाज, डॉ. अनिल उपाध्याय यांच्या टीमनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठ्या राखीचा किताब पटकावलाय. (Guinness World Records)

आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भिंडचं नाव : आशिया बुक रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी भानू प्रताप सिंग ईटीव्ही 'भारत'शी बोलताना म्हणाले की, "रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीचा मोठा सण आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील मेहगाव येथे सर्वात मोठ्या राखीचा विक्रम नोंदवला गेला आहे. ही संपूर्ण आशिया, भारतातील सर्वात मोठी राखी आहे."(Asia world record) (India Book of Records )

आशिया बुकमध्ये यापूर्वीचा विक्रम : मागील विक्रमाबद्दल बोलताना आशिया बुक रेकॉर्डचे प्रतिनिधी भानू प्रताप म्हणाले की, "आधी आशियातील सर्वात मोठ्या राखीचा विक्रम कर्नाटकातील बेंगळुरू येथे नोंदवला गेला होता. ती 400x400 फूटांची होती. परंतु आता मेहगाव, भिंड येथील राखीचं एकूण 1 हजार 150 फुटांची आहे. राखीच्या मुख्य गोलाची रचना 25 फुटाच्या व्यासाची आहे.

ओएमजी बुक रेकॉर्ड्समध्येही भिंडचे नाव : ओएमजी बुक रेकॉर्डचे सहसंपादक प्रोफेसर दिनेश गुप्ता यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आता भिंड जगातील सर्वात मोठ्या राखीसाठी प्रसिद्ध झालं आहे. यापूर्वी हिमाचलमधील एका शहीद मुलीच्या नावावर ओएमजी बुक रेकॉर्डमध्येही हा विक्रम नोंदवला गेला होता. त्या मुलीनं 10 फुटांची राखी बनवली होती. मात्र, इथल्या टीमनं खूप चांगलं काम केलयं. आतापर्यंत 1300 हून अधिक लोकांना OMG बुक रेकॉर्डमध्ये स्थान मिळालयं. 5 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. मात्र 6 व्या आवृत्तीत भिंडचे नाव छापलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलयं.

लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये राखीची नोंद : या राखीचं मोजमाप केल्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडन, एशिया बुक रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड, ओएमजी बुक रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी अशोक भारद्वाज यांच्या राखीला जगातील सर्वात मोठी राखी म्हणून घोषीत केलंयं. एवढंच नाही तर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या राखीची नोदं झाली आहे. (Limca Book of World Records )

हेही वाचा -

  1. Mamata Banerjee in Mumbai : ममता बॅनर्जी रक्षाबंधनासाठी 'जलसा'वर जाणार, अमिताभ बच्चन यांनी दिलं निमंत्रण

ABOUT THE AUTHOR

...view details