जैसलमेर (राजस्थान) - स्वातंत्र्याच्या अमृतमहोसत्वी वर्षांच्या निमित्ताने आणि 15 जानेवारी रोजी असलेल्या भारतीय सेना दिवसाच्या निमित्ताने जैसलमेर येथील युद्ध संग्रहालयात सगळ्यात मोठा खादीचा तिरंगा झेंडा ( World largest Khadi tricolor hoisted in Jaisalmer War Museum ) साकारला आहे. हा तिरंगा खादी पासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज ( World largest Khadi tricolor ) आहे. यावेळी येथे भारतीय सेनेचे उच्च अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
लेह मुंबईतही आहे खादीचा तिरंगा -
लेह आणि मुंबई नंतर जैसलमेर हे तिसरे ठिकाण आहे जेथे खादीपासून बनवलेला तिरंगा लावण्यात आला. यापूर्वी जगातील सर्वात मोठा खादीपासून बनलेला राष्ट्रीय ध्वज हा लद्दाख येथील लेह येथे होता. त्याची 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंती निमित्त स्थापना करण्यात आली होती.