हैदराबाद : 2 जानेवारी हा दिवस अंतर्मुख स्वभावाच्या लोकांना समर्पित आहे. 'जागतिक अंतर्मुख दिन' 2 रोजी जगभरात साजरा केला जातो. ज्याचा उद्देश जगाला अंतर्मुख स्वभावाच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, हा आहे. बर्याच वेळा लोक अंतर्मुख होण्याकडे एक विकार म्हणून पाहतात, जे चुकीचे आहे, तो फक्त एक स्वभाव आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हाच संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे, त्यामुळे अशा लोकांना वेगळे ठेवण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे.
'जागतिक अंतर्मुख दिना'चा इतिहास : हा दिवस साजरा करण्याचे श्रेय सुप्रसिद्ध जर्मन मानसशास्त्रज्ञ आणि लेखक फेलिसिटास हेन यांना जाते. 2011 मध्ये या दिवशी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. फेलिसिटास हेन्ने यांनी या दिवसाच्या माध्यमातून इतर लोकांना अंतर्मुख लोकांच्या वैशिष्ट्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांना अंतर्मुख असणे विचित्र वाटते, तर काही लोक याला आजारासारखे मानतात. हे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यांच्यावरील भेदभाव नष्ट व्हावा या उद्देशाने या दिवसाची सुरुवात करण्यात आली.