महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Famous Har Ki Pauri : जगप्रसिद्ध हर की पैरी धुक्यात हरवली, पहा हा व्हिडिओ - World Famous Har Ki Pauri

उत्तराखंडमध्ये थंडीने थैमान घातले आहे. धुक्यामुळे थंडीचा परिणाम अधिक धोकादायक होत आहे. हरिद्वारची हर की पैरी ( World Famous Har Ki Pauri ) कुठे गायब झाली म्हणून लोकांना धक्का बसला. धुक्यामुळे वाहनचालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हरिद्वारमध्ये थंडीच्या लाटेमुळे शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ( Famous Har Ki Pauri Was Not Visible In The Fog )

World Famous Har Ki Pauri
जगप्रसिद्ध हर की पैडी

By

Published : Dec 28, 2022, 4:29 PM IST

जगप्रसिद्ध हर की पैडी धुक्यात हरवली, पहा हा व्हिडिओ

हरिद्वार : हरिद्वारमध्ये थंडी आणि धुके शिगेला पोहोचले आहे. थंडीमुळे हरिद्वारच्या हर की पैरी ( World Famous Har Ki Pauri )आणि इतर घाटांवर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. काही मोजकेच भक्त गंगेत स्नान करताना दिसतात. धुक्यामुळे हर की पैरी दिसत नव्हती. ज्याने हे दृश्य पाहिले त्यांनाही धक्का बसला. ( Famous Har Ki Pauri Was Not Visible In The Fog )

शाळाही २ दिवसांसाठी बंद :थंडी एवढी आहे की, चौकात ड्युटीवर असलेले पोलीसही आगीच्या सहाय्याने कर्तव्य बजावत आहेत. त्याचबरोबर धुक्यामुळे महामार्गावरून वाहनांना ये-जा करणे कठीण होत आहे. महामार्गावर वाहनांची संख्या कमी असली, तरी हेडलाईट लावून धावणारी वाहने सुरू आहेत. थंडीमुळे सर्व शाळाही जिल्हा प्रशासनाने २ दिवसांसाठी बंद केल्या आहेत.

अजब ऑफर :याआधीही अशीच एक घटना समोर आली होती. कडाक्याच्या थंडीत गंगास्नान करून पुण्य कमावण्याची इच्छा असणार्‍या पण पाण्यात उतरायला घाबरणार्‍या भाविकांना 10 रुपयांत तुमच्या वतीने गंगेत स्नान करतो, अशी अजब ऑफर देत एका तरुणाने कमाईचा अनोखा प्रकार शोधला.सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. आतापर्यंत लाखो लोकांनी तो बघितला आहे. संधीचे सोने करणारा तरुण, रोजगाराची नवीन संधी अशा अनेक कॉमेंटस् करत वापरकर्त्यांनी त्याचे कौतुकही केले आहे.

पाण्यात न उतरता पुण्य कमवा :हरिद्वारच्या आशुतोष शुक्लाचा हा व्हिडीओ सध्या तुफान गाजत आहे. त्यात तो गंगेच्या काठावर असलेल्या रेलिंगवर उघडा बंब बसला असून ‘थंडीत पाण्यात न उतरता पुण्य कमवा. दहा रुपयांत तुमच्या वतीने गंगास्नान’, असे मोठमोठ्याने ओरडत तो येणार्‍या भाविकांना आकर्षित करीत आहे.उत्तर भारत सध्या कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. तीर्थस्थळी देशभरातून येणार्‍या भाविकांना या हाडे गोठवणार्‍या थंडीमुळे गंगास्नानापासून मुकण्याची हुरहुर लागते. हे ध्यानात घेत आशुतोषने हा नवीनच प्रकार शोधून काढला आहे. त्याच्या या पेड गंगास्नानाला भाविकांचाही खास करून वृद्ध भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details