हैदराबाद :देशात दरवर्षी 13.5 लाख (1.35 दशलक्ष) लोक रस्ते अपघातांमुळे आपला जीव गमावतात. तसेच 5 कोटी (50 दशलक्ष) अपघातात जखमी होतात. यातील अनेक जण आयुष्यभरासाठी अपंग होतात. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तातडीनं सर्वोत्कृष्ट काळजी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्याचा आजचा दिवस आहे. हा दिवस अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांच्या संघर्षाची आणि दुःखाची आठवण करून देत. रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि अपघाताला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करतो. रोड ट्रॅफिक बळींचा जागतिक स्मृती दिन हा सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवतो. तसेच भविष्यात शोकांतिका कशा टाळता येतील याचा संदेश देतो.
इतिहास : रस्ते अपघातग्रस्तांच्या गरजा लक्षात घेऊन, रोड पीस नावाच्या स्वयंसेवी संस्थेने 1993 मध्ये रोड ट्रॅफिक बळींसाठी जागतिक स्मरण दिन सुरू केला. हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सर्वसाधारण सभेनं 26 ऑक्टोबर 2005 रोजी रस्ता अपघातातील बळी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख जगाला कळण्याकरिता स्वीकारला.
भारतातील रस्ते अपघात एका दृष्टीक्षेपात
- भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी रस्ते वाहतूक आणि राज्य महामार्ग मंत्रालयाकडून दरवर्षी प्रसिद्ध केली जाते.
- भारतातील रस्ते अपघातांच्या वार्षिक अहवालानुसार (Road Accidents in India-2022) एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली आहे.
- कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये भारतात 168491 लोकांचा जीव गेला आणि 443366 लोक जखमी झाले.
- कॅलेंडर वर्ष 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अपघातांच्या संख्येत 11.9 टक्के, मृत्यूच्या संख्येत 9.4 टक्के आणि जखमींच्या संख्येत 15.3 टक्के वाढ झाली आहे.
- भारतात दर तासाला ५३ अपघात होतात. या अपघातांमध्ये दर तासाला 19 मृत्यू होत आहेत.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गांवर 151997 (32.9 टक्के) अपघात, 106682 (23.1 टक्के) अपघात राज्य महामार्गांवर आणि 202633 (43.9 टक्के) अपघात इतर रस्त्यांवर होतात.
- 2022 मध्ये दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाला. हा आकडा एकूण मृत्यूच्या ४४.५ टक्के आहे.
- त्याच वर्षी रस्ते अपघातात 19.5 टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.
- 2022 मध्ये तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय महामार्गांवर सर्वाधिक 64105 अपघात (13.9 टक्के) झाले. मध्य प्रदेश 54432 अपघातांसह (म्हणजे 11.8 टक्के) दुसऱ्या क्रमांकावर आहे.