महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Cup 2023 : अक्षर पटेल विश्वचषक 2023 मधून बाहेर, 'या' अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान

World Cup 2023 : अष्टपैलू अक्षर पटेलला भारताच्या विश्वचषक 2023 संघातून वगळण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI नं त्याच्या बदलीची घोषणा केली आहे. भारतीय संघ शुक्रवारी सराव सामना खेळणार आहे.

World Cup 2023
World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 8:50 PM IST

Updated : Sep 28, 2023, 10:51 PM IST

नवी दिल्लीWorld Cup 2023 : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मधून बाहेर पडला आहे. आशिया कप 2023 दरम्यान अक्षर पटेलला दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप बरा होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच बीसीसीआयला त्याच्या बदलीची घोषणा करावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC नं अक्षर पटेल 2023 चा विश्वचषक खेळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आलं आहे.

  • अश्विनकडे भरपूर अनुभव :रविचंद्रन अश्विनला 115 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. या त्यानंस आंतरराष्ट्रीय स्तरावर 155 विकेट्स घेतल्या आहेत, तर कसोटीत 94 सामन्यांत 489 बळी घेतले आहेत. याशिवाय त्यानं 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.
  • 12 वर्षांनंतर मोठी संधी :भारतीय संघाला 12 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे. टीम इंडियानं 2011 मध्ये एकदिवसीय सामन्यात विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता. यावेळीही भारत विश्वचषकाचं यजमानपद भूषवत आहे. रोहित शर्मा आयसीसी स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल.

रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश :अक्षर पटेलच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. अश्विन टीम इंडियाच्या सराव सामन्यासाठी गुवाहाटीला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्यानं एकदिवसीय संघात प्रभावी पुनरागमन केलं होतं. त्यानं दोन सामन्यांत चार विकेट घेतल्या होत्या.

  • भारताचा विश्वचषक संघ :रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

अक्षर पटेला दुखापतीमुळं बाहेर :बीसीसीआयनं 5 सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांच्याशिवाय अक्षर पटेला तिसरा फिरकीपटू म्हणून या संघात स्थान मिळालं होतं. मात्र, आशिया चषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान अक्षर पटेलच्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळं तो अंतिम फेरीत खेळू शकला नाही. त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली.

Last Updated : Sep 28, 2023, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details