नवी दिल्ली : जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने हॅन्स निमनवर फसवणूक केल्याचा आरोप ( Magnus Carlsen accuses Hans Niemann of Cheating ) केला आहे. कार्लसनने सहकारी ग्रँडमास्टर हॅन्स निमनवर अशा चुकीच्या कृत्यांमध्ये गुंतलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, तो खेळणार नसल्याचे देखील म्हणले आहे. जे अशा चुकीच्या पद्धतीने खेळतात. याबाबतची माहिती मॅग्नस कार्लसनने ट्विट ( Tweet by Magnus Carlsen ) करत एका निवेदनाच्या माध्यमातून दिली.
कार्लसनने सोमवारी उशिरा एक निवेदन जारी केले, एका आठवड्यापूर्वी ज्युलियस बेअर जनरेशन कपमध्ये ( Julius Baer Generation Cup ) अमेरिकेविरुद्ध फक्त एका चालीनंतर सामन्यातून बाहेर पडला होता. याआधी, नॉर्वेच्या 31 वर्षीय कार्लसननेही निमनविरुद्धच्या आकस्मिक पराभवानंतर सेंट लुईस येथील सिंकफील्ड कपमधून माघार घेतली होती.
कार्लसनने निवेदनात लिहिले ( Statement by Magnus Carlsen ) की, "माझा विश्वास आहे की अलीकडच्या काळात निमनने जाहीरपणे कबूल केल्यापेक्षा जास्त फसवणूक केली आहे." "त्याची प्रगती असामान्य आहे आणि सिंकफिल्ड कपमधील आमच्या खेळादरम्यान मला जाणवले की तो अजिबात तणावात नव्हता. तसेच निर्णायक क्षणी तो खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत नव्हता," तो म्हणाला. काळ्या मोहऱ्याने खेळत त्याने मला असो हरवले, जसे फार कमी लोक करू शकतात.