क्वालालंपूर : आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह ( Asian Cricket Council President Jai Shah ) यांनी मंगळवारी महिला टी-20 आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर ( Womens T20 Asia Cup 2022 schedule announced ) केले आहे. या स्पर्धेला 1 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा 15 दिवस चालणार असून या स्पर्धेत सात संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने ( Round robin format ) खेळवली जाईल. ज्यामध्ये अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ही स्पर्धा बांगलादेशातील सिल्हेत ( Sylhet International Cricket Stadium Ground ) येथे खेळली जाणार आहे.
बांगलादेशातील सिल्हेत येथे सुरू होणाऱ्या महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ आपल्या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करणार आहे. तर भारतीय संघ 3 ऑक्टोबरला मलेशिया आणि 4 ऑक्टोबरला यूएईशी भिडणार आहे. सलग दोन दिवस खेळल्यानंतर संघाचा सामना 7 ऑक्टोबरला पाकिस्तानशी ( India vs Pakistan ) होणार आहे. भारत 8 ऑक्टोबरला बांगलादेश आणि 10 ऑक्टोबरला थायलंडशी राउंड रॉबिन सामन्यात खेळणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 10 दिवसांत सहा साखळी सामने खेळणार आहे. 15 ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.
महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत सहभागी सात देश -