सिल्हेट:शुक्रवारी सिल्हेट येथे महिला आशिया चषक ( Womens Asia Cup 2022 ) स्पर्धेचा तेरावा सामना भारत आणि पाकिस्तान संघात ( INDW vs PAKW ) पार पडला. या सामन्यात पाकिस्ताने निदा दारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताचा 13 धावांनी पराभव ( Pakistan beat india by 13 runs ) केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला 138 धावांचे लक्ष्य दिले होतो. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ 19.4 षटकांत 124 धावांवर गडगडला.
भारताच्या डावाची खराब सुरुवात -
138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने अवघ्या 23 धावांच्या स्कोअरवर भारताची पहिली विकेट पडली. 15 धावांवर नशरा संधूच्या गोलंदाजीवर ( Bowler Nashra Sandhu ) सभिनेनी मेघनाला अमीनकरवी झेलबाद झाली. फलंदाज जेमिमा दुसऱ्या विकेटच्या रुपाने 2 धावा काढून बाद झाली. तिला निदा दारने बाद केले. तसेच स्मृती मंधानाच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. तिला 17 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर नशरा संधूने बाद केले. पूजा चौथ्या विकेटच्या रुपाने पूजा धावबाद झाली, तर लवकरच भारताला पाचवा धक्का बसला. दयालेन हमलाता 20 धावा करून बाद झाली. तिला तुबा हसनने क्लीन बोल्ड केले.