लखनऊ - राजधानी भोपाळमध्ये एका महिलेच्या हत्येचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचा मृतदेह घराच्या बाथरूममध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. महिलेचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. गळ्याभोवती वायर घट्ट आवळल्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर पती फरार असून त्याच्यावर खुनाचा संशय आहे. ही घटना अयोध्या नगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
अयोध्या नगर पोलीस स्टेशन परिसरातील गणपती होम्स कॉलनीत मंगळवारी प्रंचड दुर्गंधी पसरली होती. सुरवातीला वास कोठून येत आहे, हेच समजत नव्हते. शोध घेतला असता प्रशांत पटेल नामक व्यक्तीच्या घरातून दुर्गंध येत असल्याचे आढळून आले. मात्र, घराला कुलुप होते. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा पोलिसांनी बाथरुममध्ये राखी पटेल यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. प्रशांत पटेल हे पत्नी राखी पटेल आणि मुलांसोबत येथे राहत असल्याचे स्थानिकांनी पोलिसांनी सांगितले.
मृत महिला राखी व पती प्रशांत एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होते. रहिवाशांनी प्रशांतला शुक्रवारी पाहिले होते. त्यानंतर तो दिसला नाही. मंगळवारी सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याने प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे. प्रशांत आणि राखीचे 12 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झाले होते.