फतेहाबाद : हरियाणातील फतेहाबादमध्ये एक अतिशय लाजिरवाणी घटना समोर आली आहे. टोहानाजवळ महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकण्यात आले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. विनयभंगाला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही घटना काल रात्री उशिराची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी महिलेचा 9 वर्षाच्या तिच्या मुलासोबत होती.
रोहतकच्या खरेंटी गावातून पीडित महिला तिच्या सासरच्या घरी येत होती. यावेळी महिलेचा 9 वर्षांचा मुलगा तिच्यासोबत होता. महिलेच्या मुलाने सांगितले की, चालत्या ट्रेनमध्ये एक तरुण त्याच्या आईसोबत गैरवर्तन करत होता. त्याच्या आईने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर तिच्या आईला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले (Woman thrown from train). दुसरीकडे, तिचा पती टोहाणा रेल्वे स्थानकावर पत्नीच्या येण्याची वाट पाहत होता.
बराचवेळ होऊनही महिला स्टेशनवर न पोहोचल्याने तिच्या पतीने याबाबत जीआरपीकडे तक्रार केली. पोलीस रात्रभर पीडितेचा शोध घेत होते. मात्र, त्यानंतर त्यात यश आले नाही. आज सकाळी पोलिसांनी पुन्हा महिलेचा शोध सुरू केला असता, टोहाणा रेल्वे स्थानकापासून सुमारे 2 किमी अंतरावर झुडपात तिचा मृतदेह (woman Thrown Out Of Train) आढळून आला. आईच्या मृत्यूची बातमी समजताच मुलाला धक्का बसला आहे. त्याचवेळी त्याच्या वडिलांनाही हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला.