अमरावती ( आंध्रप्रदेश ) - चहाच्या दुकानात एकट्या राहणाऱ्या महिलेवर पोलीस कॉन्स्टेबलच्या 19 वर्षीय मुलाने ( police constable son raped a woman ) बलात्कार केल्याची घटना विजयनगरम जिल्ह्यात घडली. आरोपींनी तिच्या मुलांसमोर पीडितेवर बलात्कार ( Vijayanagaram rape incident ) केला. आरोपी हे पीडितेचा पाठलाग करत होते. त्यामुळे घाबरून पीडिता तिच्या बहिणीच्या घरी लपली. तिथे आरोपीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
पोलीस तपासात आरोपी हेड कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, विजयनगर जिल्ह्यातील मेंटाडा झोनमधील २५ वर्षीय महिला ही पतीपासून दूर राहते. उदरनिर्वाहासाठी विजयनगर येथे ( Vijayanagaram woman rape news ) येऊन ती आर अँड बी गेस्ट हाऊसजवळील चहाच्या दुकानात काम करते. तिची चुलत बहीण आजारी आहे. तिच्यावर विशाखापट्टणम येथे उपचार सुरू ( woman rape in front of children ) आहेत.
मुलांसमोर पीडितेवर बलात्कार- पीडिता सोमवारी चुलत भावासह दुचाकीवरून बहिणीला भेटण्यासाठी गेली होती. रात्री साडेनऊ वाजता विजयनगरमला परतली. रात्री 11.30 च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत 19 वर्षीय चेरी आणि अन्य दोन तरुण तिच्या घरी आले. घरात घुसलेल्या चेरीने तिच्याशी भांडण केले. तिच्या नाकावर वाहनाची चावी मारली. तिचे डोके भिंतीवर आपटले. चेरीने तिच्या चुलत बहिणीला बाहेर फेकून दिले. मुलांसमोर तिच्यावर बलात्कार केला. दुसरी महिला तेथे आली असता आरोपींनी तेथून पळ काढला.