हैदराबाद - धावत्या रेल्वेतून उतरणे जीवासाठी धोकादायक ठरू शकते, हे माहित असूनही अनेकदा प्रवासी जोखीम घेतात. असाच प्रकार चित्तुर जिल्ह्यातील तिरुपती येथील रेल्वे स्टेशनवर घडली आहे. यावेळी देवदुतासारख्या धावलेल्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलने महिलेचे प्राण मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले आहेत. ही घटना पहाटे साडेचार वाजता घडली आहे.
महिला धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा ती तोल न सावरल्यामुळे रेल्वेखाली जात होती. हा प्रसंग पाहताना रेल्वे कॉन्स्टेबल सतिश यांनी प्रसंगावधान दाखविले. महिला रेल्वेखाली जात असताना तिला खेचून प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे आणले.
हेही वाचा-ख्रिश्चन धर्मगुरुंकडून नियमांचे उल्लंघन करत प्रार्थना; 100 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू