महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Partha Chatterjee : संतप्त महिलेने पार्थ चॅटर्जीला फेकून मारली चप्पल.. म्हणाली, 'याने गरीबांचे पैसे खाल्ले..' - wb teachers recruitment scam

तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांना मंगळवारी एका महिलेने चप्पल फेकून मारली. ईसीआय हॉस्पिटलमधून बाहेर येत असताना ही घटना घडली. त्यानंतर संतापलेल्या महिलेने तिची चप्पल काढून पार्थ चॅटर्जीच्या दिशेने फेकली. ( Woman Hurls Shoe at Partha Chatterjee )

Woman Hurls Shoe at Partha Chatterjee
संतप्त महिलेने पार्थ चॅटर्जीला फेकून मारली चप्पल.. म्हणाली, 'याने गरीबांचे पैसे खाल्ले..'

By

Published : Aug 2, 2022, 4:03 PM IST

कोलकाता ( पश्चिम बंगाल ) : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जाणारे तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांना मंगळवारी एका महिलेने चप्पलने मारले. पार्थ चॅटर्जी ईसीआय हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. ती महिलाही तेथे पोहोचली आणि पार्थला रुग्णालयात पाहताच तिने चप्पल त्याच्या दिशेने फेकली. त्यानंतर ती अनवाणी परतली. तिने जे काही केले ते अगदी बरोबर असल्याचे संतप्त महिलेने सांगितले. ती म्हणाली, "मी त्याच्यावर जोडा फेकायला आले होते. त्याने गरीब लोकांचे पैसे खाल्ले आहेत. माझ्या हातात जोडे घेऊन त्याच्या डोक्यावर मारले असते तर मला जास्त आनंद झाला असता." ( Woman Hurls Shoe at Partha Chatterjee )

दुसरीकडे, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सहकार्य करत नाहीत. ते म्हणाले की, चॅटर्जी यांनी कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ईडीच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.

पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांनी मंगळवारी सांगितले की, अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या निवासस्थानातून वसूल केलेली रक्कम त्यांच्या नकळत त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आली होती. शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्पितालाही अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण-पश्चिम कोलकाता आणि बेलघोरिया येथील अर्पिताच्या दोन फ्लॅटमधून दागिन्यांसह सुमारे 50 कोटी रुपये जप्त केले आहेत. चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी या दोघांनाही दिवसभरात वैद्यकीय तपासणीसाठी शहराच्या दक्षिणेकडील ईएसआय जोका येथे नेण्यात आले. जिथे ही घटना पार्थ चॅटर्जीसोबत घडली.

हेही वाचा :Mamata Banerjee : पार्थ चॅटर्जी यांना हटवल्यावर ममता बॅनर्जींच्या मोठ्या हालचाली; मंत्रिमंडळासह पक्षात करणार फेरबदल

ABOUT THE AUTHOR

...view details