डेहराडून ( उत्तराखंड ) : पोलीस स्टेशन राजपूर हद्दीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली ( Woman employee raped in five star hotel ) आहे. एका 15 वर्षीय तरुणावर बलात्काराचा आरोप आहे. हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगचे काम करणाऱ्या तरुणीवर हॉटेलच्या बाथरूममध्ये या तरुणाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. हॉटेलच्या महिला स्वच्छतागृहात बलात्काराच्या या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यानंतरच पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलाला आज पोलिस बाल न्याय मंडळासमोर हजर करणार आहेत.
फाइव्ह स्टार हॉटेलच्या महिलांच्या शौचालयात घुसला मुलगा : पीडितेने तक्रार दाखल केली होती की, ती पश्चिम बंगालची रहिवासी आहे. ती डेहराडूनच्या राजपूर रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगचे काम करते. शुक्रवारी सकाळी पीडित महिला प्रसाधनगृहाच्या चार्जिंग पॉईंटमध्ये मोबाईल लावून चार्ज करत होती. त्याचवेळी एक किशोर महिला स्वच्छतागृहात घुसला. पीडितेशी बोलणे सुरू केले. ही महिलांची स्वच्छतागृहे असून, येथे पुरुषांना येण्यास मनाई असल्याचे पीडितेकडून सांगण्यात आले. 'मी पाहुण्यांशी बोलत नाही', असेही पीडितेने सांगितले. तुम्हाला काही हवे असल्यास, रिसेप्शनशी बोला, असेही तिने सांगितले.