नवी दिल्ली -विविध आंदोलनांनी चर्चेत येणाऱ्या दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात धक्कादायक घटना घडली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कॅम्पसमध्ये महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला आहे. ही घटना समजताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जेएनयूमध्ये मृतदेह आढळलेल्या महिलेचा पती विद्यापीठात पीएचडी करत आहे. मृतावस्थेत आढळलेली महिला ही ब्रह्मपुत्रा होस्टेलमध्ये राहत होती. होस्टलेच्या दुसऱ्या मजल्यावरून महिलेने उडी घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी वसंत कुंज नॉर्थ पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा-काय आहे म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण, मुंबईच्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?