महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Woman Suicide : महिलेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या; पतीसोबत झाले होते भांडण - Latest News from Bihar

बिहारमधील कैमूरमधून मोठी बातमी येत आहे. जिथे एका महिलेने (Woman commit suicide with children In kaimur) तीन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हे प्रकरण भगवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील (Bhagwanpur Police Station) पटेहारी गावचे आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ती रागावली आणि तीन मुलांसह घरातून निघून गेली. नंतर तिने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारली (Woman suicide with children by jumping into well ). या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. (Latest News from Bihar)

Woman Suicide
Woman Suicide

By

Published : Oct 10, 2022, 3:24 PM IST

कैमूर (बिहार) : बिहारमधील कैमूरमधून मोठी बातमी येत आहे. जिथे एका महिलेने (Woman commit suicide with children In kaimur) तीन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हे प्रकरण भगवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील (Bhagwanpur Police Station) पटेहारी गावचे आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ती रागावली आणि तीन मुलांसह घरातून निघून गेली. नंतर तिने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारली (Woman suicide with children by jumping into well ). या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. (Latest News from Bihar)

बिहारमध्ये पारिवारिक भांडणातून महिलेची तीन मुलांसह आत्महत्या

विहीरीतून चौघांचे मृतदेह काढले : घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. विहिरीजवळील महिलेची चप्पल पाहून गावकऱ्यांना संपूर्ण प्रकरण समजले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. विहिरीत इतके पाणी भरले होते की, मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. डिझेल इंजिनने विहिरीतून पाणी काढले गेले. पाणी ओसरल्यानंतर चारही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भबुवा सदर रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी महिलेच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details