महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Fire in Car: अपघातानंतर कारला लागली भीषण आग.. पतीसमोर पत्नी जळून झाली खाक - कारला आग लागल्याने महिला जिवंत जळाली

बिहारच्या गयामध्ये एक कार पुलावरून खाली पडली आणि कारला भीषण अशी आग लागली. या अपघातात कारमधील एका महिलेचा जळून मृत्यू झाला. तर कारमधील तिचा पती कसा तरी बचावला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात आहेत.

Woman burnt alive by fire in car at Gaya
अपघातानंतर कारला लागली भीषण आग.. पतीसमोर पत्नी जळून झाली खाक

By

Published : Feb 10, 2023, 7:45 PM IST

अपघातानंतर कारला लागली भीषण आग.. पतीसमोर पत्नी जळून झाली खाक

गया (बिहार): बिहारच्या गयामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिथे एक अनियंत्रित कारला पुलावरून खाली पडून आग लागली. ज्यात एक महिला जळून ठार झाली. मात्र, तिच्या पतीने कसेतरी पळून आपला जीव वाचवला. आगीच्या ज्वाला भीषण जोरात होत्या की, पती पत्नीला गाडीतून बाहेर काढण्यात अपयशी ठरला आणि महिलेचा जिवंत जळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. आगीच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

दाम्पत्य गावाकडे परतत होते: मिळालेल्या माहितीनुसार, कारस्वार दाम्पत्य गयाहून टिकारी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या त्यांच्या मऊ गावाकडे परतत होते. प्रवास करत असताना टिकरी-कुर्था मार्गावरील कैलास मठ गावाजवळ अचानक त्यांचे वाहन नियंत्रण सुटून पुलावरून अनेक फूट खाली पडले. या अपघातात कारने पेट घेतला. कार चालवणारा पती गेट उघडून बाहेर आला आणि पत्नीलाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

पत्नी कारमध्ये जिवंत जळली:पण ज्वाला इतक्या वेगाने वाढल्या की, पत्नीला वाचवण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे महिलेचा जीवंत जळून कारमध्येच मृत्यू झाला. मढ गावातील मोबाईल व्यावसायिक राम कुमार हे पत्नी संगीता देवी यांच्यावर उपचार करून घरी परतत होते. घरी पोहोचण्याच्या वाटेवर अचानक असा अपघात झाला आणि कारमध्येच संगीता देवी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच टिकरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून संगीता देवी यांचा मृतदेह वाहनातून बाहेर काढला.

घटनेचा तपास सुरु: पोलीसही या प्रकरणाचा विविध पैलूंवर तपास करत आहेत. या वेदनादायक अपघातानंतर लोक हादरले आहेत. या संदर्भात टिकरी पोलीस ठाण्याचे अध्यक्ष श्री राम चौधरी यांनी सांगितले की, रस्त्यावरील अपघातात एक कार कल्व्हर्टवरून खाली पडून आग लागली. पती-पत्नी गाडीत बसले होते. पतीचा जीव वाचला मात्र पत्नी संगीता देवी यांचा कारमध्येच जळाल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे.


कल्व्हर्टवरून कार खाली पडून आग लागली. पती-पत्नी कारमध्ये होते. अपघातात पती बचावला तर पत्नीचा भाजून मृत्यू झाला. पोलीस विविध पैलूंचाही तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. - श्री राम चौधरी, एसएचओ टिकरी



हेही वाचा: Car Caught Fire: वेगात आलेली कार झाडाला धडकली.. उडाला आगीचा भडका, तिघे जळून खाक

ABOUT THE AUTHOR

...view details