कोलकाता(पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमधील मैना परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने रागाच्या भरात सासऱ्याचे अंडकोष फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील मैना पोलिस स्टेशन हद्दीतील बक्का गावातील आहे. महिलेने चौकशीदरम्यान सांगितले की, मला वडिलांच्या घरी जायचे होते. त्यासाठी मी माझ्या पतीला फोन करून परवानगी मागितली. परंतु, मला परवानगी दिली नाही. त्यानंतर माझे आणि घरी असलेल्या सासऱ्यांचे भांडण झाले. त्यावेळी सासरे मला शिवीगाळ करत होते अशी माहिती तीने दिली आहे.