नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ६७ हजार ३३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, एका दिवसातील सर्वाधिक ४,५२९ मृत्यूंची नोंद करण्यात आली. दरम्यान, ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला.
देशातील राज्यानिहाय कोरोनाची आकडेवारी देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३०वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंनंतर देशातील एकूण बळींची संख्या २ लाख, ८३ हजार २४८ वर गेली आहे.
दरम्यान, देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही १७ मे नंतर पहिल्यांदाच तीन लाखांच्या खाली आली आहे. ७ मे रोजी देशात एका दिवसातील सर्वाधिक (४ लाख १४ हजार १८८) रुग्णांची नोंद झाली होती. २१ एप्रिलनंतर आज पहिल्यांदाच एवढ्या कमी रुग्णांची एका दिवसात नोंद झाली आहे.
सर्वाधिक मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अजूनही सर्वात वर आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक यामध्ये एक नंबरला पोहोचले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रात सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे.
कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.