नवी दिल्ली -संसदेच्या हिवाळी अधिवेशन कालपासून (29 नोव्हेंबर) सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. ( Winter Session of Parliament ) मात्र, संसदेचे कनिष्ठ सभागृहाचे कामकाज आजपासून उद्या 1 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे आजचे सभागृहातील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. गोंधळातच तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले. ( Winter Session of Parliament Lok Sabha adjourned till tomorrow )
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठे नाट्य घडले आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित ( 12 Rajya Sabha MPs suspended ) केले आहे. गैरवर्तणूक आणि नियमबाह्य वागणुकीमुळे ही कारवाई केल्याचे सभापती नायडू यांनी म्हटले. यानंतर संसद के हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ केला. 12 खासदारांचे निलंबन हे बेकायदेशीर असल्याचे विरोधकांनी म्हटले. तसेच यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले. यासर्व पार्श्वभूमीवर संसदेचे कनिष्ठ सभागृहाचे कामकाज आजपासून उद्या 1 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
हेही वाचा -Mamta Banerjee Mumbai Visit : ममता बॅनर्जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता