हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या (winter hair starts to get dandruff) खूप सामान्य असते. हा शुभ्रपणा वेगळा दिसतो आणि केस खाजवल्यावर किंवा केस थोडेसे जरी घासले तरी खांद्यावर पांढरा पांढरा कोंडा पडू लागतो. त्यामुळे सगळ्यांसमोर केवळ लाजच वाटत नाही तर, केसांमध्ये खाज आणि घाणही वाढते आणि केस तेलकटही दिसू शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तसेच कोंडा दूर करण्यासाठी काही (these effective home remedies will get rid of problem) टिप्स आणि घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरु शकतात. Dandruff Home Remedies
कडुलिंबाचे झाड :ताजी कडुलिंबाची पाने घेऊन पेस्ट बनवा. कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे कोंडा दूर करण्यात प्रभावी ठरतात. कडुलिंबाची पेस्ट डोक्याला लावून काही वेळाने धुतल्याने डोक्यातील कोंडा दूर होतो.
खोबरेल तेल :एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबू घाला. डोक्यावर पसरलेल्या कोंडा आणि खाज सुटण्यासाठी हे तेल लावा आणि 10 ते 15 मिनिटे केसांवर ठेवल्यानंतर धुवा. हे तेल केसांच्या वाढीस देखील मदत करते.