बेळगाव : मुरैना येथे झालेल्या विमान दुर्घटनेत विंग कमांडर हनुमंत राव सारथी यांना वीरमरण आले आहे. ते कर्नाटकमधील बेळगावचे सुपूत्र होते. मुरैना येथे भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांच्या अपघातात ते शहीद झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शहीद हनुमंत राव सारथी हे संभाजी नगर, गणेशपूर, बेळगावी येथील रहिवासी होते.
विंग कमांडर हनुमंता राव यांच्या कुटुंबावर शोककळा :विंग कमांडर हनुमंत राव यांना वडील, आई, पत्नीसह दोन मुले आहेत. त्यांते एक भाऊ देखील लष्करात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत बेळगावच्या वायुसेना प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी हनुमंत राव यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे विंग कमांडर हनुमंत राव यांच्या घरावर शोककळा पसरली आहे.
हनुमंत राव यांचे वडील सैन्यात कॅप्टन :हनुमंत राव यांचे वडील रेवणसिद्दप्पा यांनीही भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून जबाबदारी संभाळली आहे. सध्या ते लष्करातून निवृत्त झाले आहेत. हनुमंत राव यांचा भाऊ प्रवीण सारथी हे देखील भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत असल्याची माहिती वायू दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
रविवारी सकाळी पोहोचणार हनुमंत राव यांचे पार्थिव :शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांमध्ये अपघात झाल्याने हवाई दलाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर हनुमंत राव यांना वीरमरण आले. हनुमंत राव हे कर्नाटकमधील बेळगावचे सुपूत्र होते. त्यांच्या अपघाताची बातमी शहरात पोहोचताच शहरावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी विशेष विमानाने हनुमंत राव यांचे पार्थिव बेळगावला पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
हनुमंत राव यांना तीन वर्षाची मुलगी तर एक वर्षाचा मुलगा :भारतीय हवाई दलात विंग कमांडर असलेल्या हनुमंत राव यांना तीन वर्षाची मोठी मुलगी आहे. तर त्यांचा लहान मुलगा तीन वर्षाचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विंग कमांडर हनुमंत राव यांना वीरमरण आल्याने बेळगाववर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर पसरला आहे. त्यांचे वडील लष्कारात कॅप्टन पदावर कार्यरत होते. मात्र आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांचे बंधू प्रविण हे देखील भारतीय हवाई दलात ग्रूप कॅप्टन पदावर कार्यरत आहे.
हेही वाचा - IAF Fighter Jets Crashed: वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात.. एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात, एक वैमानिक ठार