नवी दिल्ली -राष्ट्रपती भवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात सैन्यातील विशेष कामगिरीबद्दल आज सैन्य अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान उद्ध्वस्त करण्याचे शौर्य गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन (wing commander abhinandan varthaman) यांचा आज 'वीर चक्र'ने (Vir Chakra) सन्मान करण्यात आला. युद्धादरम्यान केलेल्या विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा हा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.
पाकिस्तानी लढाऊ विमान केले होते उद्ध्वस्त -
पाकिस्तानी F-16 हे लढाऊ विमान उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर अभिनंदन यांना आज वीर चक्र या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. 27 फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू-कश्मीरमधील राजौरी-मेंढर सेक्टरमधील लाइन ऑफ कंट्रोल (LOC) वर पाकिस्तानी लढाऊ विमान उद्ध्वस्त केले होते.
अभिनंदन सापडले होते पाकिस्तानच्या तावडीत -