महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसं सुरक्षित ठेवायचं? - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका

देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. दुसऱ्या कोरोना लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे म्हटलं जात असून ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचवण्यासाठी कोणती काळजी घ्यायची, यासंदर्भात जाणून घ्या उपचार आणि तज्ज्ञांची मते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसं सुरक्षित ठेवायचं?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसं सुरक्षित ठेवायचं?

By

Published : Jun 11, 2021, 6:12 PM IST

नवी दिल्ली -भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटानंतर तिसरी लाट येणार अशी चर्चा सुरू आहे. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक त्रास लहान मुलांना होईल, असे म्हटलं जात आहे. याउलट, डॉक्टर आणि तज्ञांनी लहान मुलांना कोरोनाचा धोका नसल्याचे सांगितले आहे. तसेच परिस्थितीत घाबरण्याऐवजी मुलांना संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी लोकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

डॉक्टर काय म्हणतात?

अलीकडेच पत्रकार परिषदेत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी हे स्पष्ट केले, की कोरोनाची तिसरी लाट मुलांवर अधिक परिणाम करेल, यासंदर्भात जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर डेटा उपलब्ध नाही. देशात आतापर्यंत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट पसरली. या दोन्ही लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे तीसऱ्या लाटेतही मुलांना कोरोनाची बाधा होईल, असे वाटत नाही. तसेच यासंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, असे रणदीप गुलेरिया म्हणाले होते. जनरल फिजिशियन, डॉ. संजय के. जैन (एमबीबीएस, एमडी) देखील डॉ. गुलेरिया यांच्या विधानाशी सहमत आहेत.

कोरोना विषाणू मुख्यत्वे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झालेल्या लोकांना प्रभावित करतो. म्हणूनच, जी मुले आधीपासूनच गंभीर रोगाने किंवा वैद्यकीय स्थितीत ग्रस्त आहेत. त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. मुलांमधील संसर्गाची आकडेवारी पाहिल्यास, पहिल्या लाटेतील मुलाच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत संक्रमित मुलांची संख्या वाढली. परंतु, बहुतेक प्रकरणांमध्ये संसर्ग सौम्य होता. शिवाय, कोरोनाचे परिणाम मुलांमध्ये तुलनेने खूपच कमी आहेत.

मुलांची काळजी कशी घ्यावी?

भविष्यकाळ अनिश्चित असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. फक्त त्यांचा आहारच नाहीतर त्यांचा रोजचा नित्यक्रम आणि व्यायामाच्या सवयींकडेही लक्ष दिले पाहिजे, असे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. लतीका जोशी यांनी सांगितले.

  • मुलांना स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यास प्रोत्साहित करा.
  • वारंवार हात धुण्यास किंवा स्वच्छ राहण्यास सांगा.
  • ताजे, घरी शिजवलेले, निरोगी आणि पचण्याजोगे जेवण द्या.
  • मुलांच्या आहारात ताज्या हिरव्या भाज्या आणि सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश करा. बाहेरचे अन्न खाण्यापासून टाळा, विशेषत: जंक फूड.
  • दररोजच्या आहारात ताजे फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि फळांची संख्या वाढवा.
  • मुलांना नारळपाणी आणि इतर निरोगी पेय पिण्यास सांगा.
  • मुलांना श्वास व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा सराव करण्यासा सांगा.
  • मुलांच्या सभोवताली सकारात्मक वातावरण ठेवा आणि त्यांना तणाव, चिंता आणि भीतीपासून दूर ठेवा.
  • मुलांना मास्क आणि सॅनिटायझेशनची आवश्यकता समजावून सांगा. मास्कशिवाय त्यांना घराबाहेर पडू देऊ नका.
  • कोणतीही लक्षणे आढळल्यास, मुलास एकटे ठेवा आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

ABOUT THE AUTHOR

...view details