श्रीनगर -काश्मीरचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आयजीपी) विजय कुमार म्हणाले, सुरक्षा दल हे अलर्ट आहे. काश्मीरमध्ये तालिबानसह सर्व आव्हानांना सुरक्षा दल हाताळू शकते. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता राहण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले. ते पुलावामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात असलेल्या सैन्यदलाच्या मुख्यालयात माध्यमांशी बोलत होते.
इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आयजीपी) विजय कुमार म्हणाले, की कोणताही दहशतवादी येथे आला तर पोलीस अधिकारी म्हणून त्याला निष्प्रभ करणे हे माझे कर्तव्य आहे. तसेच धोका असेल तर सैन्यदलाबरोबर मोहिम राबविण्याचे कर्तव्य आहे.
हेही वाचा-राकेश अस्थाना हे मोदींचे ब्रम्हास्त्र..मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधानांवर केला 'हा' गंभीर आरोप
दहशतवाद्यांबाबतची सुरक्षा दल किंवा पोलिसांना माहिती द्यावी-
तालिबानींचा काश्मीरला काय धोका आहे, याबाबत विजय कुमार म्हणाले, आम्ही सर्व प्रोफशनल पद्धतीने आव्हाने हाताळणार आहोत. आम्ही सर्व दक्ष आहोत. दहशतवादी, आत्मघातकी बॉम्बर्स किंवा आयईडीचे सेटअप करण्याचे नियोजन करणारे याविषयी काही माहिती असल्यास लोकांनी ती माहिती द्यावी, अशी त्यांनी विनंती केली.
हेही वाचा-तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांची केली सुटका; नागरिक विमानतळाच्या दिशेने रवाना
राजकीय व्यक्ती दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट
जर मोठी घटना घडली तर त्याचा सर्वाधिक स्थानिक लोकांना त्रास होणार आहे. पर्यटक येथे येण्यास घाबरणार आहेत. त्याचा कोणाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे? स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे काही माहिती असल्यास पोलीस अथवा सुरक्षा दलाला माहिती द्यावी, अशी लोकांना विनंती आहे. राजकीय व्यक्तींवर दहशतवादी हल्ले करत आहेत. त्याबाबत बोलताना राजकीय व्यक्ती हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले. जर कोणाच्या जीविताला धोका असेल तर आढावा घेऊन सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल, असेही आयजीपी विजयकुमार यांनी सांगितले.
हेही वाचा-तालिबानींच्या समर्थनार्थ पोस्ट करणे पडले महागात...14 जणांना आसाम पोलिसांकडून अटक