कोलकाता : पश्चिम बंगालमधील जातीय हिंसाचारावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडजंगी झाली आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी जोरदार टीका केली आहे. मोईत्रा यांनी ट्विट केले की, 'रामनवमीच्या दिवशी भाजपने 'हिंदूंना धोका आहे' अशी भीती वर्तवली आहे. ही परिस्थिती 2024 पर्यंत राहील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भारताला लक्ष्य करणारी विदेशी शक्ती हळू-हळू पुढे जात आहे. तसेच, हिंदू कार्ड हे एकमेव आहे ज्या माध्यमातून लोकांना भडकवता येते. दरम्यान, जय मां काली. आई बुद्धी दे, माझा देश वाचव असही ते म्हणाले आहेत.
भाजप 2024 ची तयारी करत आहे : तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी सांगितले की, भाजप 2024 साठी रोडमॅप तयार करत आहे. मोइत्रा म्हणाल्या भाजपच्या मते हिंदूंना धोका असल्याचे म्हटले जात आहे. भाजप 2024 पर्यंत हेच चालू ठेवेल. भाजपला हिंदूंचा पाठिंबा मिळवायचा असल्याने ते असे करत असतात. असे म्हणत किंवा दुफळी निर्माण करत भाजपच जमीन तयार करत आहे ज्यावर त्यांचे राजकारण चालते असही त्या म्हणाल्या आहेत.
अनेक गाड्या जाळण्यात आल्या : 30 मार्च रोजी सायंकाळी हावडा शहरातील काजीपारा येथून रामनवमीची मिरवणूक काढताना दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात दुकानांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या काही वाहनांसह अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. या भागात शुक्रवारी दुपारी पोलिसांवर स्थानिकांनी दगडफेकीच्या ताज्या घटना पाहिल्या, त्यानंतर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. तसेच, इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असूनही, परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात आहे. वृत्तसंस्था पीटीआयने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात असताना सकाळपासून वाहतूक सुरू झाली आणि दुकाने आणि बाजारपेठाही सुरू झाल्या आहेत.