बंगळुरू - मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा कर्नाटकात मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना बदलले जाईल, अशाच चर्चांना उधाण होते. मात्र, यावर पडदा पडला आहे. आगामी दोन वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सांगितले. जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींशी झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उर्वरित दोन वर्षांत आपण राज्याच्या विकासासाठी काम करू असे ते म्हणाले.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व कर्नाटक प्रदेश भाजपाचे प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा फेटाळून लावली होती. नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही. येडियुरप्पा पुढील दोन वर्षे मुख्यमंत्री राहतील आणि कार्यकाळ पूर्ण करतील, असे अरुण सिंह म्हणाले होते.