महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोवा विधानसभा निवडणुकीत सर्व 40 जागा लढणार; मनीष सिसोदिया यांची घोषणा

गोवा विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी केली. भ्रष्टाचारमुक्त राजकारण पाहू इच्छित असलेल्या सर्वांना आपमध्ये सामील होण्याचे त्यांनी आवाहन केले.

मनीष सिसोदिया
मनीष सिसोदिया

By

Published : Apr 12, 2021, 4:16 PM IST

पणजी -गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी केली. पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष संपूर्ण 40 जाग लढवणार असल्याचे ते म्हणाले. 2017 मध्ये गोव्या विधानसभा निवडणूक पार पडली होती. आम आदमी पक्ष गोव्यात भाजपची कोंडी होणार करणार दिसून येत आहे.

मनीष सिसोदिया यांनी माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर आणि मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. भ्रष्टाचारमुक्त राजकारण पाहू इच्छित असलेल्या सर्वांना आपमध्ये सामील होण्याचे त्यांनी आवाहन केले.

पुढील वर्षी गोवा विधानसभेच्यान निवडणुका होणार आहेत. गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. शिवसेनाही गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विधानसभा निवडणुका लढवत असून पुढील वर्षीही गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागा लढणार असल्याची माहिती आहे. सध्या गोव्यात भाजपाचे सरकार आहे. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, भाजपाने मित्रपक्षांसोबत आघाडी करत काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवलं. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.

गोवा विधानसभेतील संख्याबळ -

एकूण जागा 40 आहेत. यात काँग्रेसकडे 17, भाजपाकडे 13 ,महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3, अपक्ष 3, गोवा फॉरवर्ड पार्टी 3 आणि राष्ट्रवादीकडे– 1 जागा आहे.

हेही वाचा -स्पुतनिक-व्ही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details